UPI Payments in May 2023: मे महिन्यात युपीआयद्वारे झाला इतक्या लाख कोटींचा व्यवहार... जाणून घ्या

एप्रिलमध्ये 14.07 लाख कोटी रुपये हस्तांतरित केले गेले आहेत.
UPI Payment
UPI PaymentDainik Gomantak
Published on
Updated on

UPI Payments in May 2023: नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या माहितीनुसार युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे या वर्षी मे महिन्यातील व्यवहार 9 अब्जांवर पोहोचले. देशातील किरकोळ पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टीम चालविणाऱ्या अंब्रेला बॉडीने ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे.

NPCI च्या माहितीनुसार, UPI वर 9 अब्जाहून अधिक व्यवहार झाले आहेत. NPCI ने म्हटले आहे की मोबाईलवरून UPI ​​द्वारे सुलभ पेमेंटमध्ये 9.41 अब्ज रुपयांच्या व्यवहारात 14.89 लाख कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली आहे.

दुसरीकडे, एप्रिलमध्ये सादर केलेल्या आकडेवारीनुसार, 8.89 अब्ज व्यवहारात 14.07 लाख कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत.

UPI Payment
Sakshi Case: साक्षी हत्याकांडात पोलिसांना मिळाले महत्त्वाचे पुरावे; साहिलचे तीन मित्रही रडारवर

UPI द्वारे दररोज 1 अब्जाहून अधिक व्यवहार

त्याच वेळी, मार्चमध्ये, UPI द्वारे 8.68 अब्ज व्यवहार झाले होते आणि त्यातून 14.10 लाख कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली होती. गेल्या तीन महिन्यांत यूपीआयच्या माध्यमातून 14 लाख कोटी रुपयांहून अधिकचे व्यवहार झाले आहेत.

PwC इंडियाच्या अहवालात असे नमूद केले आहे की, 2026-27 पर्यंत UPI व्यवहार प्रतिदिन 1 अब्जपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, ज्यापैकी किरकोळ पेमेंट 90 टक्के असेल.

"द इंडियन पेमेंट्स हँडबुक - 2022-27" च्या आणखी एका अहवालात असे म्हटले आहे की, 2022-23 दरम्यान किरकोळ विभागातील एकूण व्यवहारातील UPI चा वाटा सुमारे 75 टक्के होता. भारतीय डिजिटल पेमेंटमध्ये 50 टक्के CAGR वर स्थिर वाढ झाली आहे.

UPI Payment
Ramayana Circuit: काय आहे मोदी सरकारची रामायण सर्किट योजना, देशातील 'या' राज्यांना...

अशा परिस्थितीत, आर्थिक वर्ष 2022-23 मधील 103 अब्जांवरून 2026-27 मध्ये 411 अब्ज रूपयांचे व्यवहार होण्याची अपेक्षा आहे.

अहवालात असे म्हटले आहे की, क्रेडिट कार्डे UPI शी लिंक झाल्यापासून डेबिट कार्डपेक्षा क्रेडिट कार्डचे अधिक व्यवहार होत आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षात क्रेडिट कार्डमधील व्यवहारांचे प्रमाण डेबिट कार्डपेक्षा जास्त असेल अशी अपेक्षा आहे.

क्रेडिट कार्ड जारी करणे पुढील पाच वर्षांत 21 टक्क्यांच्या सीएजीआरने वाढण्याची अपेक्षा आहे. तर डेबिट कार्ड 3 टक्क्यांवर स्थिर राहण्याची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com