केंद्र सरकार महिला-पुरुषांना देणार दरमहा 3000 रुपये पेन्शन

PM Pension Scheme: आम्ही तुम्हाला अशा सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला सरकारकडून दरमहा 3000 रुपये मिळतील म्हणजेच तुम्हाला वार्षिक 36,000 रुपयांचा लाभ मिळेल.
PM Karam Yogi Mandhan Yojana
PM Karam Yogi Mandhan YojanaDainik Gomantak

PM Karam Yogi Mandhan Yojana: केंद्र सरकारकडून देशातील सर्व घटकांसाठी अनेक विशेष योजना (Government Scheme) राबवल्या जातात. यात अनेक पेन्शन योजना आणि अनेक आर्थिक सहाय्य योजनांचाही समावेश आहे. अशा अनेक सरकारी योजनांबद्दल सर्वसामान्य जनतेला माहिती नसते. अशाच योजनांची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला सरकारकडून दरमहा 3000 रुपये मिळतील म्हणजेच तुम्हाला वार्षिक 36,000 रुपयांचा लाभ मिळेल. यासाठी कोण अर्ज करू शकतो कधी करू शकतो या सर्व प्रश्नांची उत्तर या माहितीमधून तुम्हाला जाणून घेवूया...

ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती

या सरकारी योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री कर्मयोगी मानधन योजना, ज्या अंतर्गत तुम्हाला दरमहा 3000 रुपयांची सुविधा दिली जाईल. ही योजना 2019 मध्ये जनतेसाठी सुरू करण्यात आली होती.

PM Karam Yogi Mandhan Yojana
Post Office Scheme: दरमहा 1,411 रूपयेे गुंतवा मॅच्युरिटीवर 35 लाखांचा रिटर्न मिळवा

पंतप्रधान कर्मयोगी मानधन योजनेंतर्गत लाभ कोणाला मिळणार

देशातील छोटे दुकानदार, व्यापारी आणि जे व्यापारी GST अंतर्गत नोंदणीकृत आहेत आणि ज्यांची उलाढाल 1.5 कोटींपर्यंत आहे ते या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. तुम्ही CSC ला भेट देऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता.

दर महिन्याला खात्यात 3000 रुपये येतील

ही एक प्रकारची पेन्शन योजना आहे, ज्याचा फायदा तुम्ही 18 ते 40 वर्षांपर्यंत घेऊ शकता. यामध्ये छोटे व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांचा समावेश आहे. या योजनेत 60 वर्षांनंतर लाभार्थीला दरमहा 3000 रुपये दिले जाणार आहे. जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सहभागी झालात तर तुम्हाला दरमहा केवळ 55 रुपये प्रीमियम भरावा लागेल . त्याच वेळी, जर तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी या योजनेत सहभागी झालात तर तुम्हाला प्रीमियम म्हणून दरमहा 200 रुपये भरावे लागतील.

पैसे थेट खात्यात येतील

प्रधानमंत्री कर्मयोगी मानधन योजनेंतर्गत पेन्शनच्या स्वरूपात मिळणारी रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाते. मात्र जेव्हा लाभार्थीचे बँक खाते आधारशी लिंक केले जाईल तेव्हाच ही रक्कम खात्यात जमा होईल. ज्या उद्योगपती आणि व्यावसायिकांना वयाच्या 60 व्या वर्षी कोणतेही उद्योगाचे साधन राहणार नाही त्याना आधार देण्यासाठी हि योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे म्हातारपणात येणाऱ्या आर्थिक अडचणी दुर करण्यासाठी याचा फायदा होईल.

या कागदपत्रांची आवश्यकता

या योजनेत फक्त तेच लोक अर्ज करू शकतात जे फक्त भारतीय नागरीक आहेत आणि ते भारतातच व्यवसाय करतात. भारताबाहेर व्यवसाय करणारे छोटे व्यापारी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, आधार कार्डशी जोडलेले बँक खाते, जीएसटी नोंदणी क्रमांक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे.

PM Karam Yogi Mandhan Yojana
Post Office Scheme: 14 लाख परतावा मिळविण्यासाठी दररोज 95 रुपये गुंतवा

फॉर्म कुठे भरता येईल

अर्जदार सर्व आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या सेवा केंद्राला भेट देऊन हा फॉर्म भरू शकतात. तेथे तुम्हाला तुमचा फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरावा लागेल आणि सर्व कागदपत्रे द्यावी लागतील. हो फॉर्म आणि सर्व कागदपत्र सबमिट केल्यानंतर तुम्ही या योजनेचे लाभार्थी होवून या योजनेचा लाभ घेवू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com