युक्रेन रशिया तणावाचा परिणाम बिअर कंपन्यांवर का होत आहे?

रशिया-युक्रेन वादामुळे (Russia-Ukraine Crisis) व्यवसाय हंगामाच्या सुरवातीच्या काळातच बिअर कंपन्यांवर ताण येत आहे.
Ukraine-Russia crisis impact on beer companies
Ukraine-Russia crisis impact on beer companies Dainik Gomantak
Published on
Updated on

उन्हाळी हंगाम बिअर कंपन्यांसाठी (Beer Companies) फायदेशीर मानला जातो. कारण या महिन्यांत बीयरची सर्वाधिक विक्री होते.भारतात उन्हाळी हंगाम सुरू होणार आहे, पण यावेळी बिअर कंपन्या खूश नाहीत. रशिया-युक्रेन वादामुळे (Russia-Ukraine Crisis) व्यवसाय हंगामाच्या सरवातीच्या काळातच बिअर कंपन्यांवर ताण येत आहे.

बार्ली बिअर बनवण्यासाठी वापरली जाते

खरं तर, रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश गहू (Wheat) पिकांचे सर्वात मोठे उत्पादक आहेत. रशिया हा जगातील सर्वात मोठा गहू निर्यातदार देश आहे, तर युक्रेन गहू निर्यातीत चौथ्या स्थानावर आहे. गव्हाच्या एकूण जागतिक निर्यातीपैकी या दोन्ही देशांचा मिळून 25 टक्के वाटा आहे. त्याचप्रमाणे बार्ली नावाची गव्हाची एक दात आहे त्यातही हे दोन्ही देश पहिल्या 5 निर्यातदारांमध्ये आहेत. बिअर बनवण्यासाठी बार्लीचा सर्वाधिक वापर केला जातो. यानंतर बिअर बनवण्यासाठी गव्हाचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. रशिया आणि युक्रेनमधील तणावामुळे बार्ली आणि गव्हाचा जागतिक पुरवठा खंडित होऊ नये, हीच भीती बिअर कंपन्यांना खात आहे.

Ukraine-Russia crisis impact on beer companies
Russia-Ukraine Crisis: संभाव्य युद्धाचा गोव्याच्या पर्यटनावर परिणाम शक्य

अनेक ठिकाणी सरकार दर ठरवते

ET च्या अहवालात प्रीमियम बिअर ब्रँड Bira91 चे मुख्य कार्यकारी अंकुर जैन यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, 'रशिया-युक्रेन संकटामुळे बिअर उद्योगातील मार्जिन कमी होऊ शकते. जवाचे भाव आधीच वाढले आहेत, युक्रेन रशिया वादामुळे बार्लीच्या किमतींवर निश्चितपणे परिणाम होणार आहे. हा परिणाम कमी करण्यासाठी बिअर कंपन्या लगेच प्रतिक्रिया देतात आणि किंमत वाढवण्याचा निर्णय घेतात का? असे प्रश्नही उपस्थित होत आहे. काही प्रकरणांमध्ये या किंमती सरकारच्या नियंत्रणाखाली आहे.'

कोरोनामुळे दोन उन्हाळे वाया गेले

भारतात 31 कॅफे आणि बार चालवणाऱ्या बीअर कॅफेचे सह-संस्थापक राहुल सिंग म्हणतात की, या दोन वर्षात व्यवसायात तोटा झाला आहे. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन आणि इतर निर्बंधांमुळे बीअर उद्योगासाठी मागील दोन हंगाम खराब गेले आहेत. आता या वेळी युक्रेनच्या वादामुळे पुन्हा व्यवसायाला अनपेक्षित धक्का बसण्याची शक्यता आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेव्हरेज कंपनीज (CIABC) चे महासंचालक विनोद गिरी यांनाही या संकटाची काळजी वाटत आहे.'आम्ही सतत परिस्थितीचे मूल्यमापन करत आहोत आणि त्याचा भारतातील दारूविक्रेत्यांवर कसा परिणाम होत आहे याचे मूल्यांकन करत आहोत.सध्या जे संकट ओढवले आहे ते नक्कीच या व्यावसायीकांसाठी चिंतेचे कारण बनू शकते, असे मत गिरी यांनी व्यक्त केले आहे.

स्थानिक खरेदी करणाऱ्यांचे नुकसान

मोतीलाल ओसवाल यांनी नुकत्याच दिलेल्या एका अहवालात म्हटले आहे की, स्थानिक पातळीवर बार्ली विकत घेणार्‍या मद्यविक्रेत्यांनाही या संकटाचा फटका बसण्याची शक्यता आहे.युक्रेनच्या संकटामुळे बार्लीचा जागतिक पुरवठा विस्कळीत होईल, ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत त्याच्या किमती वाढणार असा अंदाज आहे. आणि असे झाले तर साहजिकच भारतातही बार्लीचे भाव वाढतील.त्यामुळे आता पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण झाल्यास गेल्या दोन हंगामात कमी विक्रीचा फटका बसलेल्या बिअर कंपन्यांना खर्चात वाढ झाल्यामुळे कमी मार्जिनला सामोरे जावे लागू शकते.

Ukraine-Russia crisis impact on beer companies
शताब्दी आणि वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी असणार खास सोयी

बिअर कंपन्यांसाठी हा महिना खास का आहे?

भारतात मार्च ते जुलै या कालावधीत 40 ते 45 टक्के बिअरची विक्री होते. बीअर कंपन्यांनी असा अंदाज व्यक्त केला होता की, सलग दोन खराब हंगामानंतर बीयर विक्री हंगाम या वर्षी वार्षिक आधारावर 40 टक्क्यांनी वाढू शकते. कोरोना महामारीशी संबंधित निर्बंधांमुळे गेल्या दोन उन्हाळ्यात रेस्टॉरंट्स, बार आणि क्लब बंद होते.या तिन्ही ठिकाणी सर्वाधिक बिअर विक्री होते. पण हंगामाच्या काळात बार बंद असल्यामुळे व्यावसायीकांना मोठा तोटा झाला. 2020 मध्ये देशभरात लॉकडाऊन लागू असताना अनेक दारूविक्रेत्यांना हजारो लीटर बिअर नाल्यात टाकावी लागली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com