Tweet Edit Feature: 21 सप्टेंबरपासून ब्लू सब्सक्राइबर्संना मिळेल ट्विट एडिट करण्याची सुविधा

Tweet Edit Feature: ट्विटर ब्लू सब्सक्राइबर्ससाठी 21 सप्टेंबरपासून ट्विट एडिटिंग फीचर सुरू करणार आहे.
Tweet Edit Feature
Tweet Edit FeatureDainik Gomantak
Published on
Updated on

ट्विटर 21 सप्टेंबरपासून ट्विट एडिट फीचर आणणार आहे. हे फिचर प्रथम त्या ब्लू सदस्यांसाठी उपलब्ध असेल जे दरमहा 4.99 रू. पेमेंट करतात. ट्विट एडिट फिचर (Tweet Edit Feature) वापरकर्त्यांना त्यांचे ट्विट प्रकाशित झाल्यानंतर संपादित करण्याची परवानगी देते. संपादित ट्विटवर एक आयकॉन, टाइमस्टॅम्प आणि लेबल दिसेल, जे मूळ ट्विट एडिट केले आहे असे दिसेल.

केसी न्यूटन या ट्विटर अधिकाऱ्याने सांगितले, लेबलवर टॅप केल्याने दर्शकांना ट्विटच्या एडिट हिस्ट्रीवर जाता येईल. जे भूतकाळात किती वेळा ट्विट (Twitt) एडिट केले गेले आहे हे समजेल. पुढील आठवड्यापासून ही सुविधा जनतेसाठी उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. बुधवार 21 सप्टेंबर 2022 पासून ट्विटर हे फीचर सुरू करण्याचा विचार करत आहे, असे ट्विट त्यांनी पोस्ट केले.

टायपिंग आणि व्याकरणाच्या चुका दुरुस्त करण्यासाठी ट्विटर वापरकर्त्यांना एडिट बटण प्रदान करण्याची मागणी बऱ्याच काळापासून ट्विटर वापरकर्त्यांकडून केली जात होती. या महिन्याच्या सुरुवातीला, ट्विट एडिट फिचर लोकांसमोर आणण्यापूर्वी ट्विटरने प्रथम ट्विट एडिट फिचरची चाचणी त्याच्या अंतर्गत कार्यसंघासह केली. या फीचरद्वारे टायपोच्या चुका सुधारणे, मिसिंग टॅग जोडणे यासारख्या गोष्टी करता येणार आहे.

ट्विटरने म्हटले आहे की हे फिचर एका लहान गटासाठी उपलब्ध करून देत आहे. जेणेकरून लोक या फिचरचा गैरवापर करू शकतात हे कळू शकेल. या चाचणी कालावधीत, ही सुविधा फक्त न्यूझीलंडच्या ब्लू सदस्यांसाठी सुरू केली जाईल. यानंतर, सुरुवातीच्या चाचण्यांमधून धडा घेऊन ही सेवा जगभरात सुरू करू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com