Twitter नव्हे आता 'X' डॉट कॉम; एलन मस्क यांची मोठी घोषणा

मस्क यांनी नुकतेच X चिन्ह ट्विट करत याबाबत अपडेट दिली आहे.
Elon Musk Twitter New Logo:
Elon Musk Twitter New Logo: Dainik Gomantak
Published on
Updated on

Elon Musk Twitter New Logo: जगप्रसिद्ध उद्योजक आणि ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी ट्विटरबाबत महत्वपूर्ण बदल केला आहे. ट्विटरचा लोगो आता एक्स होणार पूर्वीची चिमणी गायब होणार आहे. मस्क यांनी एक्स डॉट कॉम (x.com) यापुढे थेट ट्विटरच्या संकेतस्थळावर घेऊन जाईल अशी माहिती मस्क यांनी दिली आहे. मस्क यांनी नुकतेच X एवढेच चिन्ह ट्विट करत याबाबत अपडेट दिली आहे.

मस्क यांनी ट्विटरच्या लोगोबाबत यापूर्वीच माहिती दिली होती. ट्विटरची चिमणी जाऊन त्याठिकाणी एक्स येणार याचे सूतोवाच त्यांनी दिले होते. याबाबत त्यांनी एक व्हिडिओ देखील पोस्ट केला होता. त्यात आज सकाळी त्यांनी नव्या 'एक्स' लोगोची घोषणा केली.

मस्क यांनी त्यांच्या बायोमध्ये देखील एक्स डॉट कॉम (x.com) असे अपडेट केले आहे. लोगो लवकरच अपडेट होणार असल्याचेही मस्क यांनी म्हटले आहे.

Elon Musk Twitter New Logo:
Tesla In India: एलन मस्क यांना भारत सरकारचा झटका; टेस्लासाठी नवीन धोरण तयार करणार नसल्याचे स्पष्ट

एलन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासून त्यात अनेक बदल केले. ब्लू टिक साठी असणारे नियम बदलून त्यांनी ही सुविधा पेड केली. त्यातही तीन प्रकारचे व्हेरिफिकेशन टिक त्यांनी लॉन्च केल्या. त्यानंतर त्यांनी सीईओपदी देखील नवीन व्यक्ती बसवत मोठ्या बदलांचे संकेत दिले.

मस्क ट्विटरवर आता वाचता येणाऱ्या ट्विटची संख्या देखील कमी करणार आहेत. यातही व्हेरिफाईड आणि नॉन व्हेरिफाईड अशी विभागणी केली जाणार असून, त्याचप्रमाणे वाचता येणाऱ्या ट्विटची संख्या निश्चित केली जाणार आहे. दरम्यान, ट्विटरशी स्पर्धा करत इन्स्टाग्राम थ्रेड बाजारात नव्याने आले आहे. यामुळे मस्क यांच्यापुढे ट्विटरचे युझर टिकवून ठेवण्याचे आव्हान असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com