Share Market: फक्त 76 पैशांचा होता शेअर, आज एक लाखांची गुंतवणूक 44 लाख रूपये झालीय...

तुम्हाला शेअर बाजारात नफा कमवायचा असेल, तर तुम्ही दीर्घकाळ स्टॉक होल्ड करा. असे शेअर बाजारातील तज्ज्ञ सांगतात.
Share Market
Share MarketDainik Gomantak
Published on
Updated on

शेअर बाजार हा अचूक हिशोबाचा खेळ आहे. जर तुम्ही तुमचे पैसे योग्य स्टॉकवर लावले तर तुम्ही श्रीमंत व्हाल. पण जर बाजी उलटली तर तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.

तुम्हाला शेअर बाजारात नफा कमवायचा असेल, तर तुम्ही दीर्घकाळ स्टॉक होल्ड करा. असे शेअर बाजारातील तज्ज्ञ सांगतात. असाच एक स्टॉक आहे, ज्याने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

या स्टॉकचे नाव ट्रायडेंट लिमिटेड असे आहे, ज्याने 10 वर्षांत शेअर धारकांना 4,300 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. यादरम्यान शेअरची किंमत 0.76 रुपयांवरून 33.70 रुपयांपर्यंत वाढली आहे.

दहा वर्षांपूर्वी म्हणजेच 5 जुलै 2013 रोजी हा शेअर NSE वर रु.0.76 असा व्यवहार करत होता. 7 जुलै 2023 रोजी ट्रायडेंट लिमिटेडचा शेअर रु.33.70 वर बंद झाला. अशाप्रकारे, या शेअरची किंमत 10 वर्षांत सुमारे 4,334 ने वाढली आहे. म्हणजेच, जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि होल्ड केले असते, तर 1 लाख रुपयांचे मूल्य आज 44.34 लाख रुपये झाले असते.

ट्रायडेंट लिमिटेड या वस्त्रोद्योग क्षेत्रातील कंपनीच्या समभागांच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, गेल्या एका महिन्यात समभागात किरकोळ वाढ झाली आहे. मात्र गेल्या वर्षभरात त्यात 13 टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या पाच वर्षांत ट्रायडंटच्या समभागांनी आपल्या गुंतवणूकदारांना 489.16 टक्के परतावा दिला आहे.

कंपनीच्या बाजार भांडवलाबद्दल बोलायचे तर ते 17,000 कोटी रुपये आहे. कंपनी कापड, रसायने, कागद आणि सूत तयार करते. कंपनीच्या उत्पादनांमध्ये प्रिंटिंग पेपर, विणकाम, होजियरी धागा आणि गव्हाच्या पेंढ्यापासून बनवलेले सल्फ्यूरिक ऍसिड यांचा समावेश आहे

कंपनीचे बहुतांश उत्पन्न निर्यातीतून येते. कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, त्यात प्रमोटर्सचा हिस्सा 73.19 टक्के आहे. तर, सार्वजनिक भागधारकांचा हिस्सा 25.56 टक्के आहे. स्टॉक सध्या 4.56 च्या PB सह व्यापार करत आहे.

गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा नफा 116 कोटी रुपये होता. हे एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 50 टक्के कमी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com