Chingari App Controversy: टीकटॉकची जागा घेणाऱ्या चिंगारीचे अश्लील उद्योग? विविध आरोपामुळे अ‍ॅप वादाच्या भोवऱ्यात

चिंगारी अ‍ॅपच्या पेड 1 ऑन 1 व्हिडिओ कॉल फीचरमुळे हा सगळा गोंधळ निर्माण झाला आहे.
Chingari App Controversy
Chingari App ControversyDainik Gomantak
Published on
Updated on

Chingari App Controversy: शॉर्ट व्हिडिओ हा सध्या सर्वाधिक कन्झ्युम केला जाणारा फॉरमॅट आहे. भारत सरकारच्या गृह खात्याने टीकटॉकसह अनेक चिनी मोबाईल अ‍ॅप भारतात बॅन केल्यानंतर, त्याचा फायदा घेण्यासाठी विविध शॉर्ट व्हिडिओ सुविधा पुरवणारे अ‍ॅप बाजारात दाखल झाले

यात चिंगारी ही कंपनी देखील आली व अल्पावधीत प्रसिद्ध झाली, दरम्यान याच चिंगारी कंपनीविरोधात गंभीर आरोप करण्यात आले असून, सध्या हे अ‍ॅप वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या चिंगारी अ‍ॅपवर अ‍ॅडल्ट कंटेंट देत असल्याचा आरोप केला जात आहे. एका अहवालानुसार, खाजगी चिंगारी कंपनी नवीन कॉलिंग फीचरद्वारे प्रौढ अ‍ॅप बनवत आहे. असा आरोप केला जात आहे.

चिंगारी अ‍ॅपच्या पेड 1 ऑन 1 व्हिडिओ कॉल फीचरमुळे हा सगळा गोंधळ निर्माण झाला आहे. व्हिडिओ कॉलवर यूजर्स आणि क्रिएटर्समध्ये आक्षेपार्ह गोष्टी घडल्याचं बोललं जात आहे. क्रिएटर्सना पैशाच्या बदल्यात लाईव्ह कॉलवर येण्याची ऑफर दिली जात आहे.

याबाबत सोशल मीडियामधून याबाबत चिंगारीच्या नवीन फीचर्सबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, कंपनीने याप्रकरणी स्पष्टीकरण जारी केले आहे.

Chingari App Controversy
कुडचडे येथे हिट अँड रन! भर पावसात कारची दुचाकीला धडक, ऐनवेळी उडी मारली म्हणून...

क्रिएटर्स लोकांसाठी देखील ऑफर दिली जात असून, यात चांगल्या दिसणाऱ्या मुलींना ऑफर दिली जात असून, त्यांना लाइव्ह कॉलवर येण्यासाठी त्यांना पैसे दिले जातील असेही बोलले जात आहे. दरम्यान, कंपनीवर करण्यात आलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत. प्रायव्हेट कॉल फीचर क्रिएटर्सना व्हिडिओद्वारे एकमेकांशी कनेक्ट होण्याची संधी देते. असे कंपनीने म्हटले आहे.

या फीचरमध्ये युजर्स कमेंट करू शकतात, प्रश्न विचारू शकतात आणि व्हर्च्युअल गिफ्टही पाठवू शकतात. क्रिएटर्सना त्यांच्या कंटेटवरून कमाई करण्याची संधी मिळते. दरम्यान, 2020 मध्ये टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर, चिंगारी अ‍ॅप लोकप्रिय झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com