Mumbai ते दिल्ली, सायबर फ्रॉडच्या तीन घटना, वाचा आणि सतर्क व्हा; अन्यथा तुमचही खातं होईल रिकामं

Cyber Fraud: सायबर फसवणुकीचे जाळे देशभरात वेगाने पसरत आहे. लोक नवनवीन मार्गाने निरपराध लोकांची फसवणूक करत आहेत.
Cyber Fraud
Cyber FraudDainik Gomantak
Published on
Updated on

Cyber Fraud: सायबर फसवणुकीचे जाळे देशभरात वेगाने पसरत आहे. फ्रॉड लोक नवनवीन मार्गाने निरपराध लोकांची फसवणूक करत आहेत.

यातच, ऑनलाइन फसवणुकीची 3 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये एका व्यावसायिकासह 3 जणांची सुमारे 60 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, व्यवसाय सुरु करण्याच्या प्रस्तावाच्या नावाखाली एका व्यावसायिकाची 42 लाखांची फसवणूक करण्यात आली.

तीन प्रकरणे

1- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेया जोशी नावाच्या महिलेने (Woman) गुरुग्रामचे व्यापारी सुनील अरोरा यांची 42 लाख रुपयांची सायबर फसवणूक केली आहे.

एफआयआरनुसार सुनीलने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तो इंस्टाग्रामवर संपर्कात आल्याचे त्याने तक्रारीत म्हटले आहे.

अमेरिकास्थित श्रेया जोशी नावाच्या महिलेने केशर, जिरे, तेल आणि केशर पावडरच्या विक्रीचा व्यवसाय सुरु करण्याचा प्रस्ताव दिला होता. तिने मला हे साहित्य विकत घेण्यास सांगितले.

Cyber Fraud
Mumbai Cyber Fraud: महिलेची ऑनलाईन फसवणूक, मिठाई खरेदी करणे पडले महाग

सुनीलने सांगितले की, 'मला शंका आल्यानंतर पावडरचे काही नमुने घेतले आणि प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले.

तेथून अहवाल आल्यानंतर यासंबंधी सौदा करण्यात आला. त्यानंतर मी श्रेयाला हप्त्या-हप्त्यामध्ये 42 लाख रुपये ट्रान्सफर केले. पैसे ट्रान्सफर केल्यानंतर तिने फोन केला.

मात्र, ती आता ई-मेललाही उत्तर देत नाही. श्रेयाबद्दल काहीच माहिती नाही.' पोलिसांनी आता, श्रेया जोशी आणि इतरांवर भारतीय दंड संहिता (IPC) कलम 420 (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

2- दुसऱ्या घटनेत रश्मी नावाच्या महिलेसोबत 15 लाखांची सायबर फसवणूक झाली आहे. वास्तविक, तिने ऑनलाइन काहीतरी ऑर्डर केले होते.

पण जेव्हा पार्सल पोहोचले नाही तेव्हा तिने कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर शोधला. दुसरीकडे, रश्मीची एवढीच चूक झाली की, तिने चुकीच्या लिंकवर क्लिक केले.

या लिंकवरुन तिची सायबर फसवणूक झाली. 9 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारीदरम्यान तिच्या खात्यातून 15 लाखांची चोरी झाली.

Cyber Fraud
Cyber Crime: सायबर क्राइमच्या अशा 7 पद्धती ज्या तुमचे बॅंक अकाऊंट करु शकतात रिकामे; आत्ताच जाणून घ्या

3- सायबर फसवणुकीची तिसरी घटना मुंबईत घडली. स्वस्त दरात डॉलर देण्याच्या नावाखाली चोरट्यांनी एका वृद्ध व्यक्तीची दीड लाख रुपयांची फसवणूक केली. मिळालेल्या माहितीनुसार, ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरुन या वृद्ध व्यक्तीची सायबर फसवणूक झाली.

या पद्धतींनी फसवणूक करतात

सायबर फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांमध्ये आम्ही लोकांना जागरुक करत आहे. या पद्धतींचा अवलंब करुन तुम्ही ऑनलाइन फसवणूक टाळू शकता.

व्हिडिओ कॉलद्वारे ब्लॅकमेल करणे किंवा तुमच्या नावावर कर्ज घेऊन फसवणूक करणे. घोटाळ्याच्या अनेक पद्धती अलीकडच्या काळात समोर आल्या आहेत. काही काळापूर्वी हा शब्द मोठ्या घोटाळ्यांसाठी वापरला जात होता, परंतु आता तो सामान्य झाला आहे. दररोज वापरकर्त्यांसोबत ऑनलाइन फसवणूक किंवा घोटाळा होत आहे.

Cyber Fraud
Cyber Crime: लिंक क्लिक केल्यावर पैसे गेलेच कसे? सायबर चोरांच्या हुशारीसमोर पोलिस थक्क

OTP फ्रॉड

ही फसवणूक खूप ट्रेंडमध्ये आहे. घोटाळेबाज अशा फसवणुकीला अनेक प्रकारे अंमलात आणतात. उदाहरणार्थ, काही प्रकरणांमध्ये ते तुम्हाला थेट OTP विचारतात,

तर काहींमध्ये ते तुम्हाला प्रोडक्ट रिटर्न करण्याच्या नावावर OTP विचारतात. यापूर्वी अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशी अनेक प्रकरणे यापूर्वीही समोर आली आहेत.

एनसीआयबीने याबाबत ट्विटही केले आहे. एनसीआयबीने याबाबत ट्विटही केले आहे. या प्रकारच्या फसवणुकीत स्कॅमर्स कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर घेऊन तुमच्या घरी पोहोचतात.

जेव्हा लोक हा ऑर्डर घेण्यास नकार देतात तेव्हा ते रद्द करण्यास सांगतात. त्यानंतर तुमच्याकडे बनावट कस्टमर केअरच्या नावाने ओटीपी येतो. जेव्हा तुम्ही ओटीपी शेअर करता तेव्हा फसवणूक करणाऱ्यांचे काम होते.

सिम स्वॅपिंग

सिम स्वॅपिंगची पद्धत देखील खूप लोकप्रिय आहे. सिम स्वॅपिंग किंवा कार्ड स्वॅपिंगमध्ये, स्कॅमर पहिल्यांदा लक्ष्याबद्दल सर्व तपशील गोळा करतो.

या तपशीलांच्या आधारे, घोटाळेबाज वापरकर्त्याच्या नावाने डुप्लिकेट सिम कार्ड खरेदी करतात. स्कॅमर वापरकर्त्याचे तपशील मिळविण्यासाठी सोशल इंजिनिअरिंग, फिशिंग लिंक आणि इतर पद्धती वापरतात.

Cyber Fraud
Tata Power Cyber Attack: देशातील सर्वात मोठ्या खासगी वीज कंपनीवर सायबर हल्ला

मनी फॉर लाइक

या प्रकाराला अनेकजण बळी पडत आहेत. यामध्ये, घोटाळेबाज लोकांना युट्युबवर चॅनल सबस्क्राइब करुन व्हिडिओ लाइक करायला लावतात. वापरकर्त्याला अडकवण्यासाठी, सुरुवातीला स्कॅमर काही व्हिडिओंसाठी पैसे देखील देतात, जेणेकरून कोणालाही त्यांच्यावर संशय येऊ नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com