Cyber Crime: सायबर क्राइमच्या अशा 7 पद्धती ज्या तुमचे बॅंक अकाऊंट करु शकतात रिकामे; आत्ताच जाणून घ्या

Cyber Crime: तिला चित्रपटाला एका लिंकद्वारे रेटिंग द्यायचे असल्याचे सांगितले
cyber crime
cyber crime Dainik Gomantak

Cyber Crime: संपूर्ण जग आता डिजिटलचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहे. डिजिटलचे काही फायदे असले तरी काही तोटेही आहेत. सायबर क्राइममध्ये मोठ्आ प्रमाणात वाढ होताना दिसत आहेत. सायबर क्राइममुळे अनेकांचे नुकसान झाल्याचे आपण रोज पाहतो. आता तुम्हाला सायबर क्राइमपासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर हे गुन्हे कशाप्रकारे केले जातात याची माहिती असणे गरजेचे आहे.

1.चित्रपटाला रेटिंग

काही दिवसांपूर्वी नोएडामधील एका महिलेला मोबाइलवर मेसेजद्वारे नोकरीची संधी असल्याचे सांगितले गेले. घरबसल्या पैसे कमावण्याची संधी मिळणार असल्याचे सांगत तिला चित्रपटाला एका लिंकद्वारे रेटिंग द्यायचे असल्याचे सांगितले. सुरुवातीला तिच्या खात्यातून 10 हजार रुपए गेले. त्यानंतर तिच्या खात्यातून 12 लाख रुपए गेले. महिलेच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तिने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत

2. क्रेडिट कार्ड रिवॉर्ड प्वाइंट

एका व्यक्तीला अनोळखी नंबरवरुन महिला बॅंक अधिकारी असल्याचे सांगत क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड प्वाइंट असल्याचे सांगत फसवल्याची माहीती समोर आली आहे.

हे रिवॉर्ड प्वाइंट लगेच रिडिम केले नाही तर त्याची मुदत संपून जाईल असे सांगत बॅंक डिटेल्स विचारण्यात आले. त्याला एक लिंक पाठवून ती लगेच भरण्यास सांगितले. त्या व्यक्तीने ती लिंक भरल्यानंतर त्याच्या खात्यातून 22, 341 रुपए कट झाल्याचे त्याच्या लक्षात आले.

3. वीज बील

एका व्यक्तीला तुम्ही वीज बील भरले नाही त्यामुळे तातडीने तुम्ही वीजबील भरले नाही तर कनेक्शन कट होऊ शकते असा त्यांना मेसेज आला होता. या व्यक्तीला एनीडेस्क अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीचा फोन हॅक करुन २७ लाख रुपए त्याच्या अकाऊंटमधून काढून घेतले.

4. एटीएम ब्लॉक

मध्यप्रदेशमधील एक व्यक्ती एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला असताना त्याचे कार्ड एटीएममशीनमध्ये अडकले.त्यानंतर त्याने तिथे असलेल्या कस्टमर केअर नंबरवर कॉल केला. त्यांनी त्याला एटीएम कार्ड तिथेच सोडा,आम्ही ते इंजिनिअरकडून काढून घेऊ असे सांगण्यात आले. हा व्यक्ती जेव्हा घरी पोहोचला तेव्हा 51 हजार रुपए त्यांच्या खात्यातून काढले असल्याचा मोबाइलवर मेसेज आला.

अशा प्रकरणांमध्ये असे लक्षात आले आहे की, लुटारु एटीएम कार्ड रीडरवर फेविक्विकचे काही थेंब टाकतात आणि कस्टमर केअरच्या जागी आपला नंबर लावतात.

cyber crime
Indian Railways: रेल्वेसाठी पहिल्यांदाच आली खूशखबर, आता ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीबाबत होणार निर्णय!

5. वर्क फ्रॉम होम जॉब

फरीदाबादमधील एका महिलेला सोशल मिडियावर वर्क फ्रॉम होम जॉबची ऑफर देण्यात आली होती. तिलाही सवा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.

6. पेटीएमद्वारे फसवणूक

जर तुमच्या पेटीमएमवर चुकुन पैसे आले आणि त्यानंतर फोन येण्यास सुरुवात झाली तर सावध राहा. कारण अशीच दिल्लीत राहणाऱ्या एका व्यक्तीची २१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

7. न्यूड व्हॉट्सअॅप कॉल

अनोळखी नंबरवरुन रात्री न्यूड व्हॉट्सअॅप कॉल करुन ते कॉल रेकॉर्ड करुन लोकांना ब्लॅकमेल करण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. अनेकांनी अशा प्रकारांमुळे आत्महत्यादेखील केल्याचे समोर आले आहे.

अशा अनेकप्रकारे सायबरक्राइमद्वारे आपली फसवणूक होऊ शकते. पण यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करणे सोडून देणे किंवा तंत्रज्ञानाला घाबरणे हा पर्याय असू शकत नाही. डिजिटलच्या दुनियेत वावरताना सतर्क आणि सुरक्षित राहत तंत्रज्ञानाचा वापर करणे हाच एकमेव पर्याय असू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com