आज बुधवारी आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी मार्केट(Share Market) थोड्या वाढीने खुले झालेले पाहायला मिळाले. आज बीएसईचा(BSE) मुख्य निर्देशांक 52,801 अंकांवर उघडला असून तो काल सेन्सेक्स(Sensex) 397.04 अंक वधारून 52,769.73 अंकांवर बंद झाला होता. सेन्सेक्स 100 अंकांनी खाली 52668 अंकांवर होता.
महिंद्रा, एल अँड टीसह केवळ अशा काही निवडक शेयर्समध्येच वाढ दिसून अली आहे.
एनएसईचा निफ्टी 50 देखील 43 अंकांच्या खाली 15768 अंकांवर पोहोचला आहे . मंगळवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 119.75 ने वाढून 15,812.35 वर पोहोचला आहे.
सेन्सेक्स कंपन्यांपैकी आयसीआयसीआय बँकेच्याशेअर्समध्ये 2.83 टक्क्यांनी वाढ झाली. एचडीएफसी, अॅक्सिस बँक, सन फार्मा, एनटीपीसी आणि महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांचे शेयर्स सुद्धा वधारले तर दुसरीकडे, एचसीएल टेक, डॉ. रेड्डीज, मारुती आणि टेक महिंद्रा यांच्या शेअर्स मध्ये घसरण झाली आहे.
सुरवातीच्या बाजारचा आजचा विचार करता सेन्सेक्सच्या 30 कंपन्यांपैकी 21 कंपन्यांचा किंवा शेयर्सचा फायदा झाला तर नऊ कंपन्यांचा तोटा झालेला पाहायला मिळत आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप 0.46 टक्क्यांनी वधारला असून जियोजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे रिसर्च हेड विनोद नायर म्हणाले की अनुकूल आर्थिक परिणाम आणि आशियाई बाजारातील सकारात्मक कल यांच्यामुळे देशांतर्गत बाजारात वाढ झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.