Rupee VS Dollar: डॉलरच्या तुलनेत रुपया 80.02 वर पोहोचला

रुपया गुरुवारी प्रति डॉलर 80.02 वर पोहोचला.
Indian Rupee VS Dollar
Indian Rupee VS Dollar Dainik Gomantak
Published on
Updated on

गुरुवारी रुपया 1 पैशांनी घसरून सुरुवातीच्या व्यापारात यूएस डॉलरच्या तुलनेत 80.02 या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला. बुधवारी रुपया 79.99 वरती बंद झाला. रिझर्व्ह बँकेने रुपयाची झपाट्याने घसरण होण्यापासून बचाव करण्यासाठी आणखी $100 अब्ज विकण्याची तयारी दर्शविल्यानंतर गुंतवणूकदार मध्यवर्ती बँकेकडे लक्ष देतील अशी अपेक्षा आहे. (The rupee touched 80.02 against the dollar)

Indian Rupee VS Dollar
Microsoft Teams Down: हजारो वापरकर्त्यांसाठी मायक्रोसॉफ्ट टीम्स डाउन

रुपयाने गुरुवारी सुरुवातीस प्रति डॉलर 80 च्या पुढे आणखी एक नवीन सर्वकालीन नीचांक गाठला. युरोप आणि जपानमधील मध्यवर्ती बँकेच्या बैठका आणि रशियन गॅसच्या पुरवठ्यावरील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार धारवर राहिले होते.

रुपयाने 80.0013 ते 80.0638 या श्रेणीत व्यापार केला, प्रथमच भारतीय चलन प्रति डॉलर 80 च्या वर व्यवहार करत आहे. सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया एक पैशांनी घसरून 80.02 च्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर पोहोचल्याचे PTI ने नोंदवले आहे.

Indian Rupee VS Dollar
पेट्रोल-डिझेलच्या निर्यातीवरील कर कमी गोव्यात इंधन स्वस्त?

तसेच बुधवारी 79.99 च्या बंद झालेल्या आणि मंगळवारी 80.0650 च्या विक्रमी नीचांकी पातळीच्या तुलनेत अर्धवट परिवर्तनीय रुपया प्रति डॉलर 80.01/02 मिळवत होता. रिझर्व्ह बँकेने रुपयाची झपाट्याने घसरण होण्यापासून बचाव करण्यासाठी आणखी $100 अब्ज विकण्याची तयारी दर्शविल्यानंतर गुंतवणूकदार मध्यवर्ती बँकेकडे लक्ष देतील अशी अपेक्षा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com