RBI ने रेपो दरात केली वाढ

RBI ने रेपो दर 40 बेसिस पॉईंट्सने वाढवून 4.4 टक्के केला आहे.
Shaktikant Das
Shaktikant DasDainik Gomantak

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन बेंचमार्क पॉलिसी रेटमध्ये अचानक वाढ केली. RBI च्या चलनविषयक धोरण समितीने रेपो दरात 40 बेसिस पॉइंट्स किंवा 0.4% वाढ केली आहे. म्हणजेच आता रेपो रेट 0.4% झाला आहे.

गव्हर्नर दास (RBI Governor Shaktikant Das) म्हणाले की, ''रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जाणवत असून, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही युद्धाचा परिणाम समजून घेतला आहे. त्याच वेळी, वाढत्या महागाईच्या (Inflation) पार्श्वभूमीवर, RBI आता आपल्या बेंचमार्क दरात वाढ करत आहे.''

Shaktikant Das
RBI च्या स्थापनेत आंबेडकरांनी बजावली महत्वाची भूमिका, तेव्हा...

दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून आरबीआयने धोरण कायम ठेवले होते. एप्रिल 2022 पर्यंत चलनविषयक धोरण समितीच्या मागील 11 बैठकांमधून पॉलिसी दर अपरिवर्तित ठेवण्यात आला होता. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या बैठकीत एमपीसीने रेपो रेट 4 टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के कायम ठेवला होता.

तसेच, रेपो रेटवर रिझर्व्ह बँक व्यावसायिक बँकांना त्यांच्या तात्काळ गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज देते, तर रिव्हर्स रेपो रेट अंतर्गत, बँकांना त्यांचे पैसे रिझर्व्ह बँकेकडे ठेवण्यावर व्याज मिळते.

आरबीआय (RBI) गव्हर्नर म्हणाले की, 'मध्यवर्ती बँकेने गेल्या महिन्यातच आपली उदारमतवादी भूमिका मागे घेण्याचा आपला इरादा जाहीर केला होता.' त्यांच्या घोषणेनंतर, आरबीआय जूनमध्येच बेंचमार्क दर वाढवू शकते असा अंदाज वर्तवला जात होता.

तसेच, बैठकीनंतर दास म्हणाले की, 'भू-राजकीय वाढत्या तणावामुळे महागाई वाढत आहे. रेपो रेट वाढीचे उद्दिष्ट मध्यम कालावधीत आर्थिक विकास साध्य करण्यासाठी आवश्यक आहे. अन्नधान्याच्या महागाईत आणखी वाढ होऊ शकते.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com