देशात डिमॅट अकाऊंटचा आकडा 13.2 कोटींच्या पार; वर्षभरात तब्बल 2.79 कोटी खात्यांची भर

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीकडे वाढता ओढा
Demat Accounts Increased:
Demat Accounts Increased:Dainik Gomantak
Published on
Updated on

Demat Accounts Increased: शेअर मार्केटमबाजारात सुरू असलेली तेजी आणि चांगला परतावा यामुळे देशातील डिमॅट खात्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. ऑक्टोबरपर्यंत देशात 13.22 कोटीहून अधिक डिमॅट खाती होती. हा आकडा गेल्या 11 महिन्यांतील उच्चांक आहे.

यापैकी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (CDSL) मध्ये सुमारे 9.85 कोटी खाती आहेत आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी (NSDL) मध्ये 3.38 कोटी खाती आहेत. वर्षभरापूर्वीच्या तुलनेत डिमॅट खात्यांमध्ये सुमारे 2.79 कोटींची वाढ झाली आहे.

डिजिटल अ‍ॅप्सचे योगदान

डिजिटल क्रांतीमुळे शेअर बाजारात व्यवहार करणे अ‍ॅपद्वारेही शक्य झाले आहे. अ‍ॅप आधारित अनेक कंपन्यांमुळेही गुंतवणूकदारांची संख्या वाढली आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने, कंपन्या अधिकाधिक ग्राहकांना सेवा प्रदान करण्यास सक्षम आहेत.

Demat Accounts Increased:
Israel-Hamas युद्धामुळे अमेरिकन शस्त्रास्त्र कंपन्या मालामाल; शेअर्स वधारल्याने कंपन्यांना लॉटरी

डिजिटल अ‍ॅपने नवीन लोकांना डीमॅट खात्याशी जोडले आहे. या अॅप्समुळे जुन्या कंपन्यांनाही त्यांच्या सेवांमध्ये सुधारणा करावी लागली आहे.

चांगला परतावा

जाणकारांच्या मते, मार्चपासून मार्केटमध्ये चांगली वाढ झाली आहे. आतापर्यंत मिडकॅप शेअर्सनी चांगला परतावा दिला आहे. या वर्षी अधिक बदल दिसून येतील कारण मिडकॅप आणि स्मॉलकॅप चांगले परतावा देत आहेत.

बहुतेक गुंतवणूकदारांना या शेअर्समध्ये पैसे गुंतवणे आवडते. मार्चपासून आतापर्यंत सेन्सेक्स 9.34 टक्के आणि निफ्टी 11.24 टक्क्यांनी वाढला आहे.

Demat Accounts Increased:
Work From Home चे लाड बंद होताहेत! आठवड्यातून तीन दिवस ऑफिस बंधनकारक, विप्रोची कर्मचाऱ्यांना सूचना

आणखी वाढणार

यापुढील काळातही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढीचा वेग कायम राहील. गुंतवणूकदारांची संख्या अजूनही खूपच कमी आहे. डिमॅट खात्यात वाढ झाल्याचा अर्थ असा होतो की शेअर बाजार चांगली कामगिरी करत आहे.

मार्चपासून तेजी

शेअर मार्केटमध्ये मार्चपासून गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळाला आहे, त्याचा परिणाम डिमॅट खात्यांवरही दिसून येत आहे. यापूर्वीही बाजारातील तेजीमुळे डिमॅट खात्यांकडे लोकांचा कल वाढला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com