Share Market: बाजार वधारला,सेन्सेक्स नव्या उच्चांकावर तर निफ्टीही वाढला

सेन्सेक्स 53,229 तर निफ्टी 15,940 वर पोहोचला(Share Market)
The market on high, the Sensex hit new highs and the Nifty grown up
The market on high, the Sensex hit new highs and the Nifty grown upDainik Gomantak
Published on
Updated on

कालच्या स्थिरतेनेंर शेअर मार्केट(Share Market) मध्ये आज गुरुवारी मात्र चांगली सुरुवात झालेली पाहायला मिळाली काळ 52,904.05 अंकांनी बंद झालेला सेन्सेक्स(Sensex) 52,968 च्या ओपनिंगने सुरू झाला. एलटी, टेकमच्या शेअर्सच्या पार्श्वभूमीवर 163 अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स 53,067 वर पोहोचला होता. तर दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी(Nifty) 15,853.95 अंकांच्या आधीच्या बंदच्या तुलनेत 15,895 अंकांनी सुरु झाला आहे. (Stock Market)

तर याघडिला सेन्सेक्स 53,229 तर निफ्टी 15,940 वर पोहोचला आहे.

सुरूवातीला काळ थोडासा स्थिर राहिलेला बाजार नंतर मात्र चांगली कमाई करताना दिसला होता व्यापक बाजारातील सकारात्मक प्रवृत्तीमुळे सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात वाढ होऊन काल ही वाढ 2,33,06,440.17 कोटी रुपयांवर पोहोचली होती.

बाजारात बरीच खरेदी चालू आहे. निर्देशांकातील निफ्टीची मिड कॅप आणि स्मॉल कॅप दोन्ही हिरव्या रंगात आहेत. मोठ्या समभागांपेक्षा गुंतवणूकदारांचे लक्ष याकडे अधिक आहे. निफ्टीच्या मिड कॅप निर्देशांकात जवळपास अर्ध्या टक्क्यांची वाढ आहे. स्मॉल कॅप इंडेक्स जवळपास 1% वाढला आहे.

The market on high, the Sensex hit new highs and the Nifty grown up
MasterCard वर देशात बंदी, RBI चा दणका !

तज्ज्ञांच्या मते कंपन्यांच्या चांगल्या तिमाही निकालांच्या अपेक्षेच्या पार्श्वभूमीवर आयटी कांपनीच्या शेअर खरेदीला चालनाआणि अनुकूल आर्थिक आकडेवारीमुळे बुधवारी शेअर बाजारामध्ये नफ्याचा कल कायम राहिला.काळ सुरुवातीच्या तोट्यातून सावरल्यानंतर सेन्सेक्स सलग दुसर्‍या व्यापार सत्रात नफ्यावर बंद झाला होता.

बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स बुधवारी 134.32 अंकानी वधारून 52,904.05 वर पोहोचला. सेन्सेक्स सलग दुसर्‍या दिवशीही तेजीत राहिला.आजही आयटी आणि बँकांच्या शेअर्स मध्ये आजही वाढच होताना दिसत आहे याचमुळे बाजार आज आणखीन वर जाईल अशी शक्यताही तज्ञांकडून वर्तवला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com