5G Spectrum
5G Spectrum Dainik Gomantak

5G स्पेक्ट्रम लिलावातून सरकारच्या उत्पन्नाचा पूर्वीचा विक्रम मोडला

2015 मध्ये सरकारने 4G स्पेक्ट्रमच्या विक्रीतून 1.09 लाख कोटी रुपये उभे केले होते. यावेळी 5G स्पेक्ट्रम लिलावात 4.3 लाख कोटी रुपयांचे एकूण 72 GHz स्पेक्ट्रम ब्लॉकवर ठेवण्यात आले आहेत.
Published on

नवी दिल्ली: देशात 5G नेटवर्कची सेवा सुरू करण्यासाठी मंगळवारपासून स्पेक्ट्रम लिलाव सुरू झाला आहे. आज दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार 27 जुलै रोजी लिलाव सुरू आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी, चार फेऱ्यांनंतर, सरकारला ₹ 1.45 लाख कोटींची विक्रमी बोली लागली. याबाबत माहिती देताना दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारपर्यंत लिलाव पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला. वैष्णव म्हणाले की, 2022 च्या अखेरीस अनेक शहरांमध्ये 5G सेवा सुरू होऊ शकते.

(The government's revenue from 5G spectrum auction broke the previous record)

5G Spectrum
जाणून घ्या,आजच्या गोव्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती

5G स्पेक्ट्रम लिलावाच्या पहिल्याच दिवशी 1.45 लाख कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाल्याने, स्पेक्ट्रम लिलावातून सरकारच्या उत्पन्नाचा पूर्वीचा विक्रम मोडला गेला आहे. 2015 मध्ये सरकारने 4G स्पेक्ट्रमच्या विक्रीतून 1.09 लाख कोटी रुपये उभे केले होते. यावेळी लिलावात 4.3 लाख कोटी रुपयांचे एकूण 72 GHz स्पेक्ट्रम ब्लॉक करण्यात आले आहेत. स्पेक्ट्रमचे वाटप 20 वर्षांसाठी असेल.

ही प्रक्रिया 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल

दूरसंचार मंत्र्यांनी म्हटले आहे की, मंत्रालय या वर्षी 15 ऑगस्टपूर्वी लिलाव प्रक्रिया पूर्ण करू इच्छिते, जेणेकरून या वर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत देशात 5G सेवा सुरू करता येईल. दूरसंचार कंपन्या 5G नेटवर्क ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मिड आणि हाय बँडचे स्पेक्ट्रम खरेदी करत आहेत. सध्याच्या 4G च्या स्पीडच्या तुलनेत या बँड्समध्ये इंटरनेट स्पीड 10 पट वाढवण्याची क्षमता आहे. मिड-रेंज स्पेक्ट्रम 3.3-3.67 GHz च्या रेंजमध्ये असेल, तर उच्च बँडमध्ये 26 GHz स्पेक्ट्रमचा समावेश आहे.

या कंपन्यांमध्ये स्पर्धा

देशात 5G नेटवर्क सुरू करण्यासाठी सर्व कंपन्या स्पर्धा करत असल्या तरी रिलायन्स जिओने यासाठी सर्वाधिक रक्कम जमा केली आहे. लिलावापूर्वी कंपनीने दूरसंचार विभागाकडे 14 हजार कोटी रुपये जमा केले आहेत. भारती एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 5,500 कोटी रुपये जमा केले आहेत. यानंतर व्होडाफोन आयडियाने 2,200 कोटी रुपये आणि अदानी नेटवर्कने 100 कोटी रुपये जमा केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com