LPG वरील सबसिडी डिसेंबरपासून होणार पूर्ववत?

देशात कोरोनाचा प्रसार काहीसा कमी झाला असताना केंद्र सरकार आता LPG वरील सबसिडी पुन्हा पूर्ववत करु शकते.
LPG
LPGDainik Gomantak
Published on
Updated on

देशात कोरोनाचा (Covid 19) प्रसार काहीसा कमी झाला असताना केंद्र सरकार (Central Government) आता LPG वरील सबसिडी पुन्हा पूर्ववत करु शकते. डिसेंबर महिन्यापासून एलपीजी (LPG) सबसिडी पुन्हा सुरु करण्यात येऊ शकते. अहवालानुसार, देशात झपाट्याने वाढत असणाऱ्या LPG गॅसच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी मोदी सरकार डिसेंबरपासून एसपीजीवरील सबसिडी बहाल होऊ शकते. भारत सरकारने जुलै 2020 पासून अनुदान बंद केले होते. अहवालानुसार, भारत सरकारने डिसेंबरमध्ये ग्राहकांना एलपीजी सबसिडी बहाल करु शकते. सरकार डिसेंबरपासून एलपीजी गॅसवरील पुन्हा एकदा सुरु करण्याच्या विचारात आहे. पेट्रोलियम कंपन्या आणि गॅस एजन्सीच्या संचालकांकडून याबद्दलचे सूचक संदेश देण्यात येत होते. केंद्र सरकार एलपीजी सिलेंडरवर 200 रुपये सबसिडी देण्याच्या निर्णयापर्यंत आले आहे.

LPG
SBI नंतर या सरकारी बँकेवर आरबीआयचा कारवाईचा बडगा

दरम्यान, दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या दरात हदल होतात. सध्या 14.2 किलोच्या सिलिंडरचे दर 899.50 रुपये एवढे आहे. मात्र येत्या महिन्यामध्ये हाच दर 200 रुपयांपर्यंत कमी होऊ शकतो. प्रमुख एजन्सी डिलर्सना प्रत्येक सिलिडंरमागे प्रत्येकी 200 रुपये सबसिडीचा संदेश आला आहे. मात्र अद्याप तरी या संदर्भात कोणताही लेखी आदेश मात्र आलेला नाही. त्यामुळे निश्चितपणे याबद्दल अधिक सांगण्याबाबत विचारले असता एजन्सीने नकार दिला आहे.

तसेच, सौदी आरामकोने प्रोपेनची किंमत $870 प्रति मेट्रिक टन आणि ब्युटेनची किंमत $830 प्रति मेट्रिक टन दिलेली होती. ज्यामुळे देशातंर्गत बाजारामध्ये एलपीजीच्या किमती वाढल्या होत्या. प्रोपेनच्या किमती $800 वरून $870 आणि ब्युटेन $795 वरून $830 प्रति मेट्रिक टनपर्यंत पोहोचल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com