Tesla Electric Cars India
Tesla Electric CarDainik Gomantak

Tesla Electric Car: प्रतिक्षा संपणार! टेस्लाची इलेक्ट्रिक कार आली भारतात, 'हे' शानदार मॉडेल लवकरच होणार लॉन्च; जाणून घ्या धमाकेदार फीचर्स

Tesla Electric Cars India: टेस्ला गेल्या काही वर्षांपासून भारतात त्यांची इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची तयारी करत आहे. तत्पूर्वी, त्यांच्या काही कार आधीच देशातील रस्त्यांवर दिसल्या आहेत.
Published on

Tesla Electric Cars India: टेस्ला गेल्या काही वर्षांपासून भारतात त्यांची इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची तयारी करत आहे. तत्पूर्वी, त्यांच्या काही कार आधीच देशातील रस्त्यांवर दिसल्या आहेत. टेस्लाचे मॉडेल 3 आणि मॉडेल Y पार्किंगमध्ये कोणत्याही कव्हरशिवाय दिसले आहेत. भारतात (India) एकूण 4 टेस्लाचे मॉडेल दिसले आहेत. यापैकी एक टेस्ला मॉडेल Y फेसलिफ्ट होते, ज्याला 'ज्युनिपर' असेही म्हणतात.

इलेक्ट्रिक कार कंपनी भारतीय मार्केटमध्ये (Indian Market) एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. टेस्ला भारतात शोरुम आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी जागा शोधत आहे. टेस्लाने भारतातील मॉडेल 3 आणि मॉडेल Y व्हेरिएंटसाठी भारतीय रस्त्यांनुसार कारमध्ये बदल करण्यासाठी अर्ज देखील सादर केले आहेत. मुंबईत पहिली डीलरशिप सुरु होण्याची शक्यता आहे.

टेस्ला 'ही' कार भारतात लॉन्च करु शकते

टेस्ला भारतीय मार्केटमध्ये पहिल्यांदा मॉडेल Y लॉन्च करु शकते. कारण एसयूव्ही सध्या जगभरात सर्वात पसंतीची बॉडी स्टाईल आहे. मॉडेल Y चा ग्राउंड क्लियरन्स चांगला आहे, जो देशातील रस्त्यांची स्थिती लक्षात घेता भारतीय मार्केटसाठी डिझाइन केलेल्या वाहनांचे एक मोठे वैशिष्ट्य आहे. टेस्ला मॉडेल 3 लॉन्च करणार नाही कारण त्याचा ग्राउंड क्लियरन्स कमी आहे, ज्यामुळे त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते.

शानदार कार

ग्लोबल मार्केटमध्ये मॉडेल Y केवळ एकाच कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे. ही कार ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टिमने सुसज्ज आहे, ज्यामध्ये लांब पल्ल्याची बॅटरी पॅक आहे. तिची कमाल रेंज 526 किमी असल्याचे सांगितले जाते. याशिवाय, ही कार ताशी 200 किमीच्या कमाल वेगाने धावू शकते. ही कार केवळ 4.6 सेकंदात 0 ते 96 किमी प्रति तास वेग वाढवू शकते.

इलेक्ट्रिक कारचे फीचर्स

दरम्यान, या टेस्ला कारमध्ये हीटिंग आणि व्हेंटिलेशनसह पॉवर-अ‍ॅडजस्टेबल सीट्स, 15 स्पीकर्स आणि सबवूफरसह साउंड सिस्टिम, हँड्स-फ्री ट्रंक आणि आठ कॅमेरे समाविष्ट आहेत. यामध्ये ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ब्लाइंड-स्पॉट टक्कर वॉर्निंग आणि लेन डिपार्चर अव्हॉइडन्स सारख्या सक्रिय सुरक्षा तंत्रज्ञानाचा देखील समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com