एअरटेल आणि टेक महिंद्रा 5G साठी एकत्र, इनोव्हेशन लॅब तयार

मेक इन इंडियाला मिळणार चालना
 airtel and tech mahindra come together for 5g will form an innovation lab
airtel and tech mahindra come together for 5g will form an innovation labDainik Gomantak
Published on
Updated on

दूरसंचार कंपनी भारती एअरटेल आणि टेक महिंद्रा यांनी एकत्रपणे 5G, खाजगी नेटवर्क आणि क्लाउडवर डिजिटल सोल्यूशन्स विकसित आणि मार्केट करण्यासाठी करार केला आहे. एअरटेल देशात 5G साठी चाचणी करत आहे, IT कंपनी टेक महिंद्रा ने 5G अॅप्लिकेशन्स आणि प्लॅटफॉर्म विकसित केले आहेत. या संदर्भात 31 मार्च 2022 रोजी जारी केलेल्या निवेदनानुसार, एअरटेल (Airtel) आणि टेक महिंद्रा एकत्रपणे देशातील 5G, खाजगी नेटवर्क आणि क्लाउडवर एंटरप्राइझ ग्रेड डिजिटल सोल्यूशन्स विकसित करणार आहेत. (airtel and tech mahindra come together for 5g will form an innovation lab)

 airtel and tech mahindra come together for 5g will form an innovation lab
'कमिशन घेणार नाही, मतदारसंघात प्रत्येक काम दर्जेदार करणार'

भारतीय आणि जागतिक बाजारपेठांसाठी 'मेक-इन-इंडिया' उत्पादने विकसित करण्यासाठी दोन्ही कंपन्या संयुक्त 5G इनोव्हेशन लॅबची करणार आहेत. करारानुसार, दोन्ही कंपन्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी असलेले कस्टमाइज्ड एंटरप्राइझ-ग्रेड खाजगी नेटवर्क देखील स्थापित करणार आहेत.

मेक इन इंडियाला चालना मिळेल –

एअरटेल आणि टेक महिंद्राच्या या उपक्रमामुळे देशातील 5G ​​तंत्रज्ञानामध्ये मेक इन इंडियाला (Make in India) चालना मिळेल. यासह, दोन्ही कंपन्या 5G, क्लाउड आणि खाजगी नेटवर्कसाठी एकत्र काम काम करणार आहेत.

5G मार्केटसाठी दोन्ही कंपन्या मिळून एंटरप्राइझ-ग्रेड प्रायव्हेट नेटवर्क तयार करणार आहेत, जे डिजिटल अर्थव्यवस्थेचा भाग म्हणून काम करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com