Layoffs Of Tech Companies: नवीन वर्ष नोकरीच्या अनेक संधी घेऊन येईल असं वाटलं होतं, परंतु नव्या वर्षाच्या अवघ्या काही आठवड्यांतच तंत्रज्ञान क्षेत्रातून धक्कादायक बातम्या येण्यास सुरुवात झाली. वर्षाच्या सुरुवातीपासून तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना काढून धडाका लावला.
यातच आता, लेऑफ-ट्रॅकिंग वेबसाइट, Layoffs.fyi च्या रिपोर्टनुसार, 63 टेक कंपन्यांनी एकूण 10,963 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. TikTok, या लोकप्रिय शॉर्ट-व्हिडिओ अॅप कंपनीने सुमारे 60 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले. या महिन्याच्या सुरुवातीला Google आणि Amazon सारख्या टेक कंपन्यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले. तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांकडून नोकर कपातीमागचे कारण खर्च कमी करण्यावर भर देण्यात येत आहे, असे सांगितले जात आहे. चला तर मग यंदाच्या वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या टेक लेऑफवर एक नजर टाकूयात...
Frontdesk: Proptech स्टार्टअप Frontdesk ही 2024 मध्ये दोन मिनिटांच्या Google Meet कॉलवरुन सुमारे 200 कर्मचाऱ्यांना काढून टाकणारी पहिली कंपनी बनली. कॉल दरम्यान, Frontdesk CEO जेसी डीपिंटो यांनी कर्मचार्यांना सूचित केले होते.
Humane: ह्युमन नावाच्या कंपनीने त्यांच्या स्क्रीनलेस AI पिन लाँचच्या आधी 10 कर्मचाऱ्यांना काढून टाकले.
Amazon's Twitch: Amazon च्या Twitch स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने सुमारे 500 कर्मचारी काढून टाकले (35 टक्के कर्मचारी). याव्यतिरिक्त, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि एमजीएम स्टुडिओमधील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे. कंपनी आपल्या बाय विथ प्राइम युनिटमधील सुमारे 30 कर्मचाऱ्यांना काढून टाकू शकते. दरम्यान, अॅमेझॉनच्या मालकीची ऑनलाइन ऑडिओबुक आणि पॉडकास्ट सेवा ऑडिबल आपल्या कर्मचार्यांपैकी सुमारे 5 टक्के म्हणजेच सुमारे 100 कर्मचारी काढून टाकत आहे.
Google: या महिन्याच्या सुरुवातीला, Google ने सांगितले की ते व्हॉइस असिस्टंट टीम्स, Pixel, Nest आणि Fitbit साठी जबाबदार हार्डवेअर विभाग, जाहिरात विभाग आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी टीम यासह विविध युनिट्समधील अनेक कर्मचाऱ्यांना काढून टाकेल.
द व्हर्जच्या एका अहवालानुसार, सुमारे 1,000 कर्मचारी या टाळेबंदीमुळे प्रभावित झाले आहेत. Google चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की, यावर्षी अल्फाबेटच्या मालकीच्या कंपनीत अधिक नोकऱ्या कपातीची गरज आहे.
पिचाई यांनी मेमोमध्ये म्हटले आहे की, काही डिपार्टमेंटमध्ये अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी आणि गती वाढवण्यासाठी या वर्षी टाळेबंदीचे स्तर काढून टाकण्यावर भर देण्यात आला होता. दरम्यान, टेकक्रंचच्या अहवालानुसार, Google चे व्हिडिओ प्लॅटफॉर्म YouTube सुमारे 100 कर्मचार्यांना कमी करण्याचा विचार करत आहे.
Discord: इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हिस Discord ने 17 टक्के कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे, ज्यामुळे अंदाजे 170 कर्मचारी प्रभावित झाले आहेत.
युनिटी सॉफ्टवेअर: व्हिडिओगेम सॉफ्टवेअर प्रदाता युनिटी सॉफ्टवेअरने सांगितले की, ते 25 टक्के कर्मचारी कपात करणार आहे, कपातीच्या नवीन फेरीत सुमारे 1,800 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवेल.
वेफेअर: ऑनलाइन ईकॉमर्स फर्म वेफेअरने टाळेबंदीची घोषणा केली, ज्यामुळे त्याच्या 13 टक्के कर्मचारी म्हणजेच सुमारे 1,650 कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल. तसेच, कर्मचाऱ्यांना अधिक तास काम करण्याचे आवाहन केले आहे.
Riot Games: Tencent Holdings' Riot Games ने जागतिक स्तरावर 530 कर्मचारी म्हणजेच सुमारे 11 टक्के कर्मचारी काढून टाकण्याची योजना आखली आहे.
इंस्टाग्राम: मेटा-मालकीच्या फोटो-शेअरिंग अॅप इंस्टाग्रामने 60 टेक्निकल प्रोग्राम मॅनेजरची पदे काढून टाकली आहेत, द इन्फॉर्मेशनच्या अहवालानुसार. प्रभावित कर्मचार्यांना कंपनीतील इतर डिपार्टमेंटमध्ये नोकरी मिळवण्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी दोन महिन्यांचा ठेवला आहे. त्या कालमर्यादेत नवीन नोकरी मिळवण्यात ते अयशस्वी झाल्यास, त्यांचा रोजगार संपुष्टात येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.