Electric Car: क्लासिक लूक, मॉडर्न फीचर्स अन् दमदार रेंज! टाटाची SUV उडवणार महिंद्राची झोप, 'या' दिवशी होणार लॉन्च

New Nlectric SUV Harrier EV: टाटाने लॉन्च होण्यापूर्वी सोशल मीडियावर हॅरियर ईव्हीचा टीझर रिलीज केला आहे. इलेक्ट्रिक वाहन पोर्टफोलिओसाठी नवीन फ्लॅगशिप म्हणून टाटा हॅरियर ईव्ही 3 जून रोजी लॉन्च करण्यात येणार आहे.
New Nlectric SUV Harrier EV
New Nlectric SUV Harrier EV
Published on
Updated on

टाटाने एक टीझर लॉन्च करुन मोठा धमाका केला. सोशल मीडियावर टाटाच्या या टीझरचीच चर्चा रंगली आहे. टाटाने लॉन्च होण्यापूर्वी सोशल मीडियावर हॅरियर ईव्हीचा टीझर रिलीज केला. इलेक्ट्रिक वाहन पोर्टफोलिओसाठी नवीन फ्लॅगशिप म्हणून टाटा हॅरियर ईव्ही 3 जून रोजी लॉन्च करण्यात येणार आहे. टाटा हॅरियर ईव्हीचा टीझर सध्या सोशल मीडियावर धूमाकूळ घालत आहे. टाटा हॅरियर ईव्हीमध्ये नवीन अ‍ॅक्टी. ईव्ही प्लस आर्किटेक्चरचा वापर करण्यात आला असून परफॉर्मन्स, एडवांस्ड टेक्नॉलॉजी आणि ऑल-व्हील-ड्राइव्ह (एडब्ल्यूडी) सिस्टिमसह धासू कार लॉन्च करण्यात येणार आहे. मात्र टाटाने अद्याप स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबद्दल काहीही जाहीर केलेले नाही.

दरम्यान, टाटा हॅरियर ईव्हीची किंमत 30 लाख रुपये (एक्स-शोरुम) असण्याची अपेक्षा आहे. ती महिंद्रा एक्सईव्ही 9ई आणि बीवायडी अ‍ॅटो 3 सारख्या आगामी इलेक्ट्रिक एसयूव्हीशी स्पर्धा करेल. हॅरियर ईव्ही ऑल-व्हील-ड्राइव्ह आणि ड्युअल-मोटरसह येईल, असे कंपनीने सांगितले आहे. हे शानदार फीचर्स ब्रँडला चार चांद लावतील. या कारमध्ये एक मोठी बॅटरी पॅक असण्याची शक्यता आहे, जी एका चार्जवर 500 किमी पेक्षा जास्त रेंज देऊ शकते. याशिवाय, सिंगल-मोटर, फ्रंट-व्हील-ड्राइव्ह पर्यायासह परवडणारे व्हर्जन देखील असू शकते.

New Nlectric SUV Harrier EV
Electric Car: टाटा-महिंद्राचं वाढलं टेन्शन, 'ही' कंपनी 2 शानदार इलेक्ट्रिक कारसह भारतीय मार्केटमध्ये करणार एन्ट्री!

हॅरियर ईव्हीचे डिझाईन कसे असणार!

टाटा (Tata) हॅरियर ईव्हीचे डिझाईन डिझेल मॉडेलसारखेच असेल. इलेक्ट्रिक मॉडेल वेगळे दिसण्यासाठी त्यात स्पेशल एलिमेंट असतील. त्यात बंद फ्रंट ग्रिल असेल, जे इलेक्ट्रिक कारसाठी एक कॉमन डिझाईन आहे. टाटा नेक्सॉन ईव्हीवर दिसणाऱ्या वर्टिकल स्लॅट्सप्रमाणे पुढील आणि मागील बंपर पुन्हा डिझाईन केले जाऊ शकतात. याशिवाय, एसयूव्हीमध्ये एरो अलॉय व्हील्स असू शकतात, जे रेंज आणि ताकद वाढवतात. एलईडी लाईट्समध्ये कनेक्टेड डेटाइम रनिंग लाइट्स (डीआरएल) समाविष्ट आहेत आणि मागील दिवे मानक हॅरियरसारखे आहेत.

New Nlectric SUV Harrier EV
Maruti Electric Car: मारुती सुझुकी लवकरच करणार मोठा धमाका! Maruti eVitara च्या लॉन्चिंगसह कारप्रेमींना देणार शानदार 'ऑफर'

'ही' एसयूव्ही मॉडर्न फीचर्संनी सुसज्ज असणार

हॅरियर ईव्हीच्या इंटीरियरमध्ये अनेक मॉडर्न फीचर्स देण्यात आल्याची शक्यता आहे. केबिनमध्ये ब्लॅक आणि व्हाईट डुअल-टोन कलर स्कीम असण्याचीही शक्यता आहे. तसेच, 12.3-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, 10.25-इंचाचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरॅमिक सनरुफ आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स असू शकतात. प्रीमियम अपग्रेडमध्ये ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि पॉवर्ड टेलगेटचा समावेश असू शकतो. सुरक्षिततेसाठी एसयूव्हीमध्ये 6 एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा सिस्टिम आणि चांगल्या ड्रायव्हिंग सहाय्यासाठी लेव्हल 2 एडीएएस टेत्नॉलॉजी मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com