Tata Motors E-Vehicle : टाटा मोटर्स गेल्या काही वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत एक लॉंच करण्याच्या प्रयत्नात आहे आणि आता कंपनीने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. TATA मोटर्सने सांगितले आहे की, एसयूव्हीसह अनेक नवीन इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे.
कंपनीने सांगितले की, या लांब पल्ल्याच्या कार एका चार्जमध्ये 500 किमीपर्यंत चालवल्या जाऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) इलेक्ट्रिक वाहनांकडे भारत सरकारचे लक्ष केंद्रीत केले आहे, ज्याअंतर्गत भारतात इलेक्ट्रिक वाहने (E-Vehicle) बनवण्यासाठी वाहन उत्पादकांना अब्जावधी रुपयांचे प्रोत्साहन दिले जात आहे.
सध्या भारतातील एकूण कार विक्रीपैकी केवळ 1 टक्के कार इलेक्ट्रिक कारमधून येत आहे, कारण देशातील बॅटरीचा खर्च खूप असून खर्च आणि बॅटरी चार्जिंग करण्यासाठी अद्याप पर्याप्त सुविधा नाही.
अशा परिस्थितीत नवीन इलेक्ट्रिक वाहने ग्राहकांचा मूड बदलू शकतात. Tata Motors ही भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची सर्वात मोठी विक्री करणारी कंपनी आहे आणि कंपनीचे म्हणणे आहे की कर्व डिझाइन असलेली वाहने नवीन आर्किटेक्चरवर आधारित असतील जी फक्त EV साठी डिझाइन केली गेली आहेत.
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र म्हणाले की, या प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या कार येत्या दोन वर्षांत लाँच केल्या जातील. यामध्ये मोठ्या बॅटरी लावल्या जातील जेणेकरून त्या 400-500 किलोमीटर चालवता येतील. याशिवाय ही वाहने जलद चार्ज होऊ शकतील आणि त्यांना चार्ज करण्यासाठी कमी वीजही लागेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.