युपीआय, नेटबँकिंग वापरताना सावधान; हा व्हायरस करेल तुमचे बँक खाते रिकामे

अलीकडेच फोनमध्ये Xenomorph बँकिंग अ‍ॅप मालवेअर सक्रिय झाले आहे.
Xenomorph Malware
Xenomorph MalwareDainik Gomantak
Published on
Updated on

Online Payment: सध्याच्या डिजीटल युगात पैशांच्या व्यवहारासाठी सर्रास ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जातो. यामध्ये युपीआय, नेटबँकिंग, मोबाईल बँकिंगचा वापर प्रामुख्याने केला जातो. जर तुम्ही युपीआय (UPI), नेटबँकिंग (Netbanking) किंवा मोबाईल बँकिंग (Mobile Banking) वापरत असाल तर तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. कारण या पद्धतीमध्ये अनेकदा हॅकिंगचा धोका निर्माण होऊ शकतो.

Xenomorph Malware
काणकोणात बुडालेल्या मातेसह विवाहित कन्येचा मृतदेहही सापडला

अलीकडेच फोनमध्ये Xenomorph बँकिंग अ‍ॅप मालवेअर सक्रिय झाले आहे. हा धोकादायक मालवेअर या महिन्याच्या सुरुवातीला एका सुरक्षा संशोधकाने शोधला होता. संशोधकाच्या म्हणण्यानुसार, हा मालवेअर आतापर्यंत सुमारे 50 हजार अँड्रॉइड वापरकर्त्यांच्या बँकिंग अ‍ॅपमध्ये शिरला आहे.

अशावेळी हे करा...

  • कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका. ईमेलमध्ये स्पॅम आणि संशयास्पद मेल दिसल्यास ते उघडणेही टाळा.

  • तुमच्या स्मार्टफोनमध्ये एक चांगला अँटीव्हायरस अ‍ॅप इन्स्टॉल करा.

  • फोन वारंवार हँग होत असल्यास, फोन हॅक झाल्याचे इतर कोणतेही संकेत मिळत असल्यास किंवा मालवेअर आले असल्यास, तो त्वरित फॉरमॅट करा.

  • कोणतीही शंका असल्यास फोनवर नेटबँकिंग आणि UPI सारखे अ‍ॅप्स वापरणे टाळा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com