Swiggy plan IPO
Swiggy plan IPODainik Gomantak

Zomato ला टक्कर देण्यासाठी Swiggy देखील आयपीओ आणण्याच्या तयारीत

फूड डिलिव्हरी कंपनी स्वीगी देखील शेयर मार्केटमध्ये लिस्ट करण्याची तयारी करत आहे.

झोमॅटोनंतर दुसरी फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी देखील स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध होण्याची तयारी करत आहे. Swiggy 800 मिलियन दशलक्ष म्हणजेच 6000 कोटी रुपयांचा आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे.

मिळालेल्या अहवालानुसार, स्विगीने (Swiggy) ताज्या फंडिंग राऊंडमध्ये त्याचे मूल्यांकन 10.7 बिलियन केले आहे, जे दुप्पट आहे. स्विगीला केवळ अन्न वितरण न करता एक लॉजिस्टिक कंपनी म्हणून स्वत:ला प्रोजेक्ट करायचे आहे. कंपनीने आयपीओ आणण्यापूर्वी स्वतंत्र संचालकांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Swiggy plan IPO
ॲमेझॉन,टाटा यांनी केंद्राच्या ई-कॉमर्स नियमांबद्दल व्यक्त केली चिंता

2021मध्ये स्विगीची प्रतिस्पर्धी कंपनी झोमॅटो (Zomato) शेयर मार्केटमध्ये लिस्ट झाली आहे, ज्याला चांगला प्रतिसाद मिळला. तसेच झोमॅटोने सूचीपासून अत्यंत निराशाजनक कामगिरी दर्शवली आहे. झोमॅटोचा आयपीओ 76 रुपये प्रति शेयर या भावाने आला, जो 169 रुपयांवर गेल्यानंतर आता 80 रुपयांच्या जवळ व्यवहार करत आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या ऑर्डर व्हॅल्यूच्या वाढीने निराशा केली आहे. स्विगी आणि झोमॅटोच्या विक्रीची तुलना करतांना स्विगीने डिसेंबर महिन्यात 250 मिलियन विक्री दर्शवली आहे, तर झोमॅटोने ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत 733 मिलियन विक्री दर्शवली आहे.भारतातील फूड डिलिव्हरी व्यवसाय असो, किराणा डिलिव्हरी असो कोरोना काळात प्रचंड वाढ दर्शवली आहे. स्विगीने क्विक कॉमर्स डिलिव्हरी सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे ज्यामध्ये टाटा समूहाच्या बिग बास्केट, इंडस्ट्रीज-समर्थित , Dunzo टाटाद्वारे आव्हान दिले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com