Swiggy IPO News
स्विगी या खाद्य वितरण कंपनीने IPO साठी अर्ज दाखल केला आहे. कंपनी सध्या ३७५० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार स्विगी बाजार नियामक सेबिकडे कागदपत्रे दाखल केली आहेत.
स्विगी फूड डिलिव्हरी विभागातील IPO आवेदन करणारी दुसरी कंपनी ठरू शकते. या यादीत झोमॅटो आधीच दाखल झालेली आहे. कंपनीने जून २०२४ पर्यंत ११२.७ दशलक्ष ग्राहकांचा टप्पा पार केलेला आहे. Accel, Coatue, Alpha Wave, Norwst, Tencent सारखे गुंतवणूकदार शेअर्स विकून कंपनीतील त्यांची मालकी कमी करतील.
स्विगी कंपनीची फूड डिलिव्हरी सेवा 681 शहरांमध्ये उपलब्ध आहे. स्विगीने मार्केट रेग्युलेटरकडे कागदपत्रे दाखल केल्याबद्दलचा पाहिला अहवाल मनी कंट्रोलने दिला होता. गुंतवणूकदार स्विगी IPO च्या बातमीने खुश आहेत.
स्विगीचा या आर्थिक वर्षातील महसूल 11247.4 कोटी रुपये आहे. यात 36 टक्के वाढ झालेली आहे. अन्न वितरण व्यवसायात एकत्रित 10189.58 रुपये महसुलाची नोंद झालेली आहे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.