Suzuki Access 125 Ride Connect: होंडा अ‍ॅक्टिव्हाला टक्कर देणारं सुझुकीचं नवं मॉडेल; किंमतही कमी आणि फीचर्स जबरदस्त, वाचा संपूर्ण माहिती

Suzuki New Scooter: भारतीय बाजारात स्कूटर्ससाठी ओळखली जाणारी सुझुकी मोटर इंडिया प्रा. लि. कंपनीनं आपली लोकप्रिय स्कूटर 'ऍक्सेस 125' आता नव्या रुपात सादर केली आहे.
Suzuki Access 125 Ride Connect
Suzuki Access 125 Ride ConnectDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय बाजारात स्कूटर्ससाठी ओळखली जाणारी सुझुकी मोटर इंडिया प्रा. लि. कंपनीनं आपली लोकप्रिय स्कूटर 'ऍक्सेस 125' आता नव्या रुपात सादर केली आहे. 'ऍक्सेस 125 राइड कनेक्ट टीएफटी एडिशन' असं या नव्या मॉडेलचं नाव असून, यात आकर्षक टीएफटी डिस्प्ले आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसारख्या अत्याधुनिक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

या नव्या व्हेरिएंटमध्ये 4.2 इंचाचा टीएफटी (TFT) डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले केवळ स्टायलिश दिसत नाही, तर या डिस्प्लेमध्ये उच्च कॉन्ट्रास्ट, चमकदार व्हिज्युअल्स आणि जलद रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. यामुळे रायडरला चालवताना सर्व आवश्यक माहिती एका झटक्यात समजते.

Suzuki Access 125 Ride Connect
Upcoming Car In India: मायलेज, लूक आणि परफॉर्मन्सचा परफेक्ट कॉम्बो, लवकरच लॉन्च होणार 'या' 4 स्टायलिश कार्स

प्रीमियम लुक

नवीन एडिशनमध्ये ‘पर्ल मॅट एक्वा सिल्व्हर’ हा खास आकर्षक रंग सादर करण्यात आला आहे, जो स्कूटरला एक आधुनिक आणि प्रीमियम लुक देतो.

यासोबतच मेटॅलिक मॅट ब्लॅक 2, मेटॅलिक मॅट स्टेलर ब्लू, पर्ल ग्रेस व्हाइट आणि सॉलिड आयस ग्रीन हे अन्य चार पर्याय देखील उपलब्ध आहेत. ही स्कूटर तरुण वर्गासाठी विशेष आकर्षण ठरू शकते.

Suzuki Access 125 Ride Connect
Upcoming Car In India: तुमची स्वप्नवत कार लवकरच बाजारात! लॉन्च होणार 'या' 3 जबरदस्त कार; किंमतही परवडणारी

सुझुकी ऍक्सेस राइड कनेक्ट टीएफटी एडिशन आता अधिकृतपणे भारतातील सर्व डीलरशिपवर उपलब्ध करण्यात आली आहे. या नव्या मॉडेलची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत 1,01,900 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

अत्याधुनिक स्मार्ट तंत्रज्ञान, आकर्षक टीएफटी डिस्प्ले आणि नव्या रंगसंगतीमुळे हे व्हेरिएंट बाजारातील इतर 125 सीसी स्कूटर्सच्या तुलनेत अधिक स्पर्धात्मक ठरणार आहे. या अपग्रेडमुळे ऍक्सेस 125 स्कूटर सेगमेंटमध्ये आपलं स्थान अधिक बळकट करेल, अशी बाजारातील तज्ज्ञांची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com