Adani Group ला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा,दोन वर्षांपूर्वीचा निकाल बदलणार ?

दोन वर्षांपूर्वी या प्रकरणात अदानी पॉवरने (Adani Group) वीज खरेदी करार रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवला होता.
Supreme Court will reconsider the judgement of 2019 against Adani Group
Supreme Court will reconsider the judgement of 2019 against Adani GroupDainik Group

सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) आता अदानी पॉवर (Adani Power) आणि गुजरात उर्जा विकास निगम (GUVNL) प्रकरणांमध्ये 2019 च्या निर्णयावर पुनर्विचार करणार आहे. या प्रकरणी जीयूव्हीएनएलने क्युरेटिव्ह याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश एन व्ही रमण यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी करण्यास सहमती दर्शवली आहे.(Supreme Court will reconsider the judgement of 2019 against Adani Group)

सर्वोच्च न्यायालयाचा दोन वर्षांपूर्वीचा निकाल

दोन वर्षांपूर्वी या प्रकरणात अदानी पॉवरने (Adani Group) वीज खरेदी करार रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवला होता.दाखल केलेला क्युरेटिव्ह याचिका हा एखाद्या प्रकरणात सुनावणीची विनंती करण्याचा शेवटचा मार्ग आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतरच ती दाखल केली जाते.

Supreme Court will reconsider the judgement of 2019 against Adani Group
Swiggy आणि Zomato ही आता जीएसटीच्या कक्षेत

30 सप्टेंबर रोजी होणार सुनावणी

या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 सप्टेंबर रोजी होणार आहे. अदानी पॉवरच्या शेअर्सवर याचा परिणाम अपेक्षित आहे. वास्तविक हे प्रकरण 2010 सालचे आहे. अदानी पॉवरवर गुजरात विद्युत नियामक आयोगाने (GERC) चुकीचा GUVNL सोबत केलेला वीज खरेदी करार (PPA) रद्द केल्याचा आरोप केला होता. अपील न्यायाधिकरणाने जीईआरसीच्या बाजूने निर्णय दिला. यानंतर, अदानीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने. अदानीच्या बाजूने निर्णय दिला.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय होता?

पीपीए रद्द करण्याचा अदानी पॉवरचा निर्णय योग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. याचे कारण जीएमडीसीच्या नैनी ब्लॉकमधून कोळशाचा वेळेवर पुरवठा झाला नाही. त्याचबरोबर न्यायालयाने अदानीला नुकसानीच्या भरपाईचा दावा करण्याची परवानगीही दिली.यामुळे अदानी पॉवरच्या शेअर्सवर परिणाम होऊ शकतो. शुक्रवारी कंपनीचा शेअर BSE वर 1.11 टक्क्यांनी वाढून 99.85 वर बंद झाला. सध्या कंपनीचे बाजार भांडवल 38,511.54 कोटी रुपये आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com