सायरस मिस्त्री यांना झटका, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली पुनर्विलोकन याचिका

मिस्त्री यांना प्रमुख पदावरून हटवण्याच्या 2021 च्या निर्णयाचे पुनरावलोकन आणि पुनर्विचार करण्याचे आवाहन
Tata Mistry Case
Tata Mistry CaseDainik Gomantak
Published on
Updated on

सायरस मिस्त्री यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. टाटा ग्रुप विरोधात सायरस मिस्त्री यांनी अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलेल्या निर्णयाविरुद्ध दाखल केलेली पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या याचिकेत निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा असे कोणतेही कारण आढळले नाही, त्यामुळे ही याचिका फेटाळत असल्याचे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. (Tata Mistry Case)

मात्र, मिस्त्री यांच्यासाठी एक दिलासा देणारी बाब आहे. न्यायालयाने निकालातील काही प्रतिकूल टिप्पण्या दूर करण्याचे मान्य केले आहे. या याचिकेत सायरस मिस्त्री टाटा सन्सचे प्रमुख होते. त्यांना प्रमुख पदावरून हटवण्याच्या 2021 च्या निर्णयाचे पुनरावलोकन आणि पुनर्विचार करण्याचे आवाहन करण्यात आले होते. 2021 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या स्वतःच्या निर्णयावर पुनर्विलोकन याचिकेवर सुनावणी केली. 2021 मध्ये कोर्टाने टाटांच्या बाजूने निकाल दिला होता.

Tata Mistry Case
LICच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच; गुंतवणूकदारांना नकारात्मक परतावा

रतन टाटा यांचे उत्तराधिकारी म्हणून सायरस मिस्त्री यांना 2012 मध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. मात्र चार वर्षांनी म्हणजे 2016 मध्ये त्यांना पदावरुन अचानक हटवण्यात आले. टाटा समूहाने त्यांना हटवताना मिस्त्री यांची काम करण्याची पद्धत त्यांच्या मूल्यांशी जुळत नसल्याचे स्पष्ट केले होते. याच आरोपांविरोधात मिस्त्री यांनी न्यायालयात धाव घेतली होती. परंतु तिथे निकाल टाटांच्या समुहाच्या बाजुने आला. या प्रकरणी न्यायालयाने मिस्त्री यांना हटवण्याचा निर्णय योग्य असल्याचे मान्य केले. तर सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदी बसवणे ही रतन टाटांची चूक होती, असे या प्रकरणी कठोर टिप्पणी करताना कोर्टाने म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com