Supreme Court refuses to interfere in SEBI probe, orders completion of probe in three months in Adani Hindenburg Case:
हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपांवर सेबीच्या तपासात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अदानी समूहाविरुद्धच्या आरोपांशी संबंधित खटल्यात तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने आपला निकाल दिला आहे.
न्यायालयाने 22 प्रकरणांचा तपास सोपविला होता ज्यातील दोन प्रकरणांचा तपास अद्याप प्रलंबित आहे. न्यायालयाने सेबीला प्रलंबित तपास तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
यापूर्वी, हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून अनुकूल निर्णय येण्याच्या अपेक्षेने बुधवारी अदानी समूहाचे शेअर्स १०% पर्यंत वाढले. 10 शेअर्सच्या समुहामध्ये, अदानी एनर्जी सोल्युशन्स सर्वात जास्त 10% वाढले, तर अदानी टोटल गॅस 8% आणि NDTV शेअर्स 7% वाढले.
अदानी ग्रीन एनर्जी, अदानी विल्मार, अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पॉवर या कंपन्यांचे शेअर्स 5-6 च्या वाढीसह व्यवहार करताना दिसत आहेत. अहमदाबादस्थित ग्रुप फ्लॅगशिप कंपनी अदानी पोर्ट्सचे शेअर्स 3% वाढले.
बुधवारी, मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने यूएसस्थित हिंडेनबर्ग संशोधन अहवालात केलेल्या आरोपांवर दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी झाली.
अब्जाधीश गौतम अदानी यांनी 'कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठी फसवणूक' केल्याचा दावा हिंडेनबर्ग अहवालात करण्यात आला होता. गेल्या महिन्यात अनेक याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, हिंडेनबर्ग अहवालात जे काही म्हटले आहे ते पूर्णपणे बरोबर मानले जाऊ शकत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.