State Bank of Indiaने आजपासून MCLR दर वाढवला, EMIही वाढणार, जाणून घ्या नवीनतम दर

स्टेट बँक ऑफ इंडियाने आजपासून म्हणजेच 15 ऑगस्टपासून कर्जावरील आपला मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ट लेंडिंग रेटमध्ये वाढ केली आहे.
State Bank
State BankDainik Gomantak
Published on
Updated on

स्टेट बँक ऑफ इंडियाने आजपासून म्हणजेच 15 ऑगस्टपासून कर्जावरील आपला मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ट लेंडिंग रेटमध्ये(MCLR) वाढ केली आहे. बँकेच्या या निर्णयामुळे ज्या कर्जदारांचे कर्ज MCLR शी जोडलेले आहे त्यांच्या EMI मध्ये वाढ होणार आहे. रिझर्व्ह बँकेने या महिन्यातच रेपो दरामध्ये 50 बेसिस पॉईंटची वाढ केली होती. तर या वाढीपासून बँकांनी विविध कर्जदरात वाढ केली आहे. एसबीआयने गेल्या आठवड्यातच मुदत ठेवींवरील व्याजदरामध्ये मोठी वाढ केली आहे. (State Bank of India hikes MCLR rate from today EMI will also increase know latest rates)

State Bank
'पुढील 3 तासांत कुटुंबाला संपवणार' मुकेश अंबानींना आला धमकीचा फोन

लाइव्ह मिंटच्या एका अहवालानुसार, बँकेने आता एका रात्रीपासून ते तीन महिन्यांपर्यंतच्या कर्जासाठीचा MCLR दर 7.15 टक्क्यांवरून 7.35 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. त्याचप्रमाणे, सहा महिन्यांच्या कर्जाचा MCLR दर देखील 7.45 टक्क्यांवरून 7.65 टक्के करण्यात आला आहे तसेच एक वर्षाचा दर 7.5 टक्क्यांवरून 7.7 टक्के, 2 वर्षांचा MCLR दर 7.7 टक्क्यांवरून 7.9 टक्के आणि तीन वर्षांचा MCLR दर 7.8 टक्क्यांवरून 8 टक्के झाला आहे. गेल्या महिन्यात स्टेट बँक ऑफ इंडियाने MCLR 10 बेसिस पॉईंटने वाढवला होता.

MCLR म्हणजे काय?

MCLR हा बँक कर्जाचा बेंचमार्क आहे तसेच या वाढीमुळे कर्जाचा व्याजदर वाढतो. यामध्ये घट झाल्यास कर्जाचा दर कमी होत असतो. रिझव्‍‌र्ह बँकेने नुकतेच रेपो दर नियंत्रणात आणण्यासाठी वाढ केली होती मात्र त्यानंतर सर्व बँकांनी त्यांच्या एमसीएलआरमध्ये वाढ केली आहे.

एफडीचे व्याजदरही वाढले

गेल्या आठवड्यातच SBI ने मुदत ठेवींच्या व्याजदरात मोठी वाढ केली आणि या वाढीनंतर सामान्य ग्राहकांना 2.90 टक्क्यांवरून 5.65 टक्के व्याज मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन व्याजदर 3.40 टक्क्यांवरून 6.45 टक्के असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com