श्रीलंकेतील बिकट आर्थिक परिस्थितीमुळे भारतासोबतचा व्यापार जवळपास ठप्प झाला आहे यामुळे निर्यातदारांच्या पेमेंटबाबत चिंता वाढत आहे. श्रीलंकेला सात दशकांतील सर्वात अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. येथे अन्न, औषधे, इंधन आणि इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी जनतेची धडपड सुरू आहे. (sri lanka crisis impact india trade stopped exporters worried payments)
इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्स ( FIEO) चे उपाध्यक्ष खालिद खान म्हणाले, "आमची निर्यात आणि आयात पूर्णपणे ठप्प झाली आहे. निर्यातदार राजकीय संकट आणि देयके याबाबत अत्यंत सावध आहेत." मात्र, श्रीलंकेत नवे सरकार स्थापन झाल्यानंतर परिस्थिती सुधारेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
एफआयईओचे महासंचालक अजय सहाय म्हणाले की, राजकीय स्थैर्यामुळे व्यवसाय पुन्हा सुरू होण्यास मदत होईल. "सध्या एसबीआय किंवा एक्झिम बँकेने (Bank) पुरविलेल्या क्रेडिट सुविधेअंतर्गत अशा वस्तू तेथे पाठवल्या जात आहेत. यामध्ये उद्योग, औषध, खते, अन्न (Food) आणि कापड यांचा समावेश आहे,"
भारत आणि श्रीलंका यांच्यातील व्यापाराचे आकडे
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये, भारताची श्रीलंकेला निर्यात $ 5.8 अब्ज होती, या वर्षी एप्रिलमध्ये ती $ 550 दशलक्ष होती. गेल्या आर्थिक वर्षात 1 अब्ज डॉलरची आयात झाली होती, तर एप्रिल 2022 मध्ये ती $74.68 दशलक्ष होती. भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात मुक्त व्यापार करार 2000 साली झाला होता.
मुंबईस्थित (Mumbai) निर्यातदार आणि टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीजचे अध्यक्ष शरद कुमार सराफ म्हणतात, "व्यापार झपाट्याने मंदावला आहे. निर्यातदार पेमेंटबाबत चिंतेत आहेत. जानेवारीपासून माझा श्रीलंकेसोबतचा व्यापार 25 टक्क्यांनी घसरला आहे." वाहन उत्पादकांची संघटना असलेल्या सियामचे महासंचालक राजेश मेनन म्हणाले की, देशांतर्गत वाहन उद्योगासाठी श्रीलंका ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. "आम्ही आशा करतो की तिथली आर्थिक परिस्थिती लवकरात लवकर सुधारेल,"
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.