5G Mobile Service लवकरच भारतीयांच्या सेवेत, दूरसंचार कंपन्यांना सरकारने दिले आदेश

5G Update: 5G स्पेक्ट्रमच्या लिलावात स्पेक्ट्रम मिळालेल्या कंपन्यांना स्पेक्ट्रम असाइनमेंट जारी करण्यात आले आहे.
5G Mobile Services Launch
5G Mobile Services LaunchDainik Gomantak
Published on
Updated on

सरकारने दूरसंचार कंपन्यांना 5G मोबाइल सेवा सुरू करण्यासाठी तयार राहण्यास सांगितले आहे.त्यानंतर देशात 5G मोबाइल सेवा लवकर सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 5G स्पेक्ट्रम लिलावात स्पेक्ट्रम मिळालेल्या कंपन्यांना स्पेक्ट्रम असाइनमेंट जारी करण्यात आले आहेत. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करून दूरसंचार सेवा कंपन्यांना 5G मोबाइल सेवा सुरू करण्याची तयारी करण्याची विनंती केली आहे.

प्रत्यक्षात ज्या कंपन्यांना लिलावात स्पेक्ट्रम मिळाले आहे. त्यांनी सरकारला स्पेक्ट्रमचे पैसे देण्यास सुरुवात केली आहे. भारती एअरटेलने 5G लिलावात घेतलेल्या स्पेक्ट्रमसाठी 8,312.4 कोटी रुपये दिले आहेत. एअरटेलने सांगितले की त्यांनी 5G स्पेक्ट्रमच्या 4 वर्षांच्या थकबाकीचे आगाऊ पेमेंट केले आहे.रिलायन्स जिओने 7864 कोटी रुपयांचा पहिला हप्ता दिला आहे. कंपन्यांना स्पेक्ट्रमचे वाटप केले जात आहे. त्यानंतर अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांना 5G सेवा सुरू करण्यासाठी तयारी करण्यास सांगितले आहे.

5G Mobile Services Launch
Modi Government ने शेतकऱ्यांना दिली ग्रेट भेट, कमी व्याजादरात मिळणार कर्ज

रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलने आधीच घोषणा केली आहे. ते ऑगस्ट 2022 मध्ये 5G मोबाइल सेवा सुरू करतील. एअरटेलचे म्हणणे आहे की मार्च 2024 पर्यंत, भारती एअरटेल देशातील सर्व शहरे आणि प्रमुख ग्रामीण भागात 5G मोबाइल (Mobile) सेवा प्रदान करेल.

प्रत्यक्षात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाला. एकूण चार टेलिकॉम कंपन्यांनी सात दिवसांच्या 5G स्पेक्ट्रम लिलावात 1,50,173 कोटी रुपयांच्या स्पेक्ट्रमसाठी बोली लावली आहे. ज्यामध्ये एकट्या रिलायन्स जिओचा वाटा 59 टक्क्यांच्या जवळपास आहे. रिलायन्स जिओने 88,078 कोटी रुपयांच्या 5G स्पेक्ट्रमसाठी बोली लावली आहे. रिलायन्स जिओनंतर भारती एअरटेलने 43,039.63 कोटी रुपयांच्या स्पेक्ट्रमसाठी बोली लावली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com