सरकार जनतेला (Government) स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी देत आहे. Sovereign Gold Bond 2021-22 ची 11वी विक्री सिरीज 10 जानेवारी 2022 पासून सुरू होत आहे. ही योजना फक्त पाच दिवसांसाठी (10 ते 14 जानेवारी) सुरु असणार आहे. या काळात गुंतवणूकदारांना बाजारभावापेक्षा कमी दरात सोने खरेदी करण्याची संधी मिळेल. Sovereign Gold Bond योजना सरकारच्या वतीने आरबीआय (RBI) जारी करते.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सरकारी गोल्ड बाँड योजनेच्या 2021-22 च्या नव्या मालिकेसाठी 4,786 रुपये प्रति ग्रॅम किंमत निश्चित केली आहे. सुवर्ण रोखे योजना सोमवारपासून सुरू होणार असून 14 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
ऑनलाइन खरेदीवर 50 रुपये सवलत
हे सोने खरेदी करताना 50 रुपये प्रति ग्रॅम सवलत दिली जाईल, मात्र ही सुट ऑनलाइन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल माध्यमातून पैसे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना दिली जाईल. अशा गुंतवणूकदारांना ही गोल्ड बाँड योजना 4,736 रुपये प्रति ग्रॅमच्या दराने मिळेल.
कुठे खरेदी करू शकतो?
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हे सुवर्ण रोखे सर्व बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, NSE आणि BSE द्वारे विकले जातील. स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँकेत सोन्याची विक्री होणार नाही.
गोल्ड बाँड योजना
एक व्यक्ती एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 4 किलो गोल्ड बॉन्ड खरेदी करू शकते. त्याच वेळी, किमान एक ग्रॅम गुंतवणूक असणे आवश्यक आहे. ट्रस्ट किंवा तत्सम संस्थांना हीच मर्यादा 20 किलो ग्रॅमपर्यंत आहे. या योजनेचा लाभ घेण्याासाठी किमान एक ग्रॅम सोन्याच्या रोख्याची खरेदी आवश्यक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.