सोनीनं लॉन्च केलं फ्युचरिस्टिक 'वेअरेबल एअर कंडिशनर' गॅझेट! जाणून काय आहे खासियत

Sony Launches Futuristic Wearable Air Conditioner Gadget: तंत्रज्ञानाचे जग सर्व प्रकारच्या चमत्कारांनी भरलेले आहे. अशा परिस्थितीत सोनीने चमत्कार घडवला आहे.
Sony Launches Futuristic Wearable Air Conditioner Gadget
Sony Launches Futuristic Wearable Air Conditioner GadgetDainik Gomantak
Published on
Updated on

Sony Launches Futuristic Wearable Air Conditioner Gadget: तंत्रज्ञानाचे जग सर्व प्रकारच्या चमत्कारांनी भरलेले आहे. अशा परिस्थितीत सोनीने चमत्कार घडवला आहे. आतापर्यंत आपण पोर्टेबल आणि वेअरेबल उपकरणांबद्दल ऐकले असेल. पण आता सोनीने वेअरेबल एसी लॉन्च करण्याचा विक्रम केला आहे. सोनीचा हा वेअरेबल एसी स्मार्टफोनपेक्षा आकाराने लहान आहे, जो तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता. सोनीच्या वेअरेबल एसीचे नाव 'रीऑन पॉकेट' (Reon Pocket 5) आहे. हे एअर कंडिशनर आहे. Sony चे "स्मार्ट वेअरेबल थर्मो डिव्हाईस किट" डब केलेले Reon Pocket 5 23 एप्रिल रोजी रिलीझ करण्यात आले. हे किट एक वेअरेबल क्लायमेट कंट्रोल सिस्टीम आहे.

Techgenyz च्या रिपोर्टनुसार, Sony ने REON POCKET नावाचा एक वेअरेबल एअर कंडिशनर विकसित केला आहे जो उन्हाळ्यात तुमच्या शरीराचे तापमान थंड ठेवतो. हे वेअरेबल डिव्हाईसशी सुसंगत आहे जे तुम्ही इनर आणि आऊटर वेअरेबल म्हणून परिधान करु शकता आणि तुम्ही तुमच्या स्मार्टफोनद्वारे हे उपकरण नियंत्रित करु शकता. एवढेच नाही तर हे उपकरण पोर्टेबल देखील आहे. Reon Pocket 5 नवीन Reon Pocket App द्वारे नियंत्रित केले जाऊ शकते, iOS आणि Android या दोन्हीला सपोर्ट करते. सोनीच्या या पोर्टेबल एसीचा बॅटरी बॅकअप 90 मिनिटांचा असून तो पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 2 तास लागतात. सोनीच्या या पोर्टेबल एसीची किंमत 14,080 येन म्हणजे सुमारे 8,992.61 रुपये आहे. हा पोर्टेबल एसी एस, एम आणि एल साइजच्या कपड्यांमध्ये फिट केला जाऊ शकतो. जरी हा एसी सध्या फक्त पुरुषांसाठी उपलब्ध आहे.

Sony Launches Futuristic Wearable Air Conditioner Gadget
आता घरच्या घरी बनवा सिनेमा हॉल; Sony ची नवीन स्मार्ट टीव्ही बाजारात लॉन्च

सोनीने तयार केलेले उपकरण उन्हाळ्यात तसेच थंडीमध्ये उपयुक्त ठरते. सोनी रिओ पॉकेट हे असे एक उपकरण आहे जे तुम्हाला उष्णतेपासून आराम तर देतेच पण हिवाळ्यात थंडीपासूनही सुरक्षा प्रदान करते. तुम्ही हे पॉकेट आकाराचे उपकरण एका छोट्या बॅगमध्येही ठेवू शकता किंवा तुम्ही ते तुमच्या मानेच्या पाठिमागे लावू शकता. एवढेच नाही तर मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तापमान नियंत्रित करु शकता. Reon Pocket 5 साठी प्री-ऑर्डर आता Sony च्या वेबसाइटवर सुरु झाली आहे, ज्याची किंमत 139 पौंड (अंदाजे $170 USD किंवा AU$260) आहे. त्याचबरोबर पोस्ट-ऑर्डर 15 मे पासून सुरु होतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com