Solar Rooftop Scheme: सरकारी अनुदानाने छतावर तयार करा वीज, बिल भरण्याचे टेन्शन नाही

भारत सरकार पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांऐवजी पर्यायी स्त्रोतांवर जास्त भर देत आहे. सरकारला डिझेल-पेट्रोलचा वापर कमी करून आयात बिल कमी करायचे आहे.
Solar Rooftop Scheme
Solar Rooftop SchemeDainik Gomantak
Published on
Updated on

Solar Rooftop Scheme: भारत सरकार पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांऐवजी पर्यायी स्त्रोतांवर जास्त भर देत आहे. सरकारला डिझेल-पेट्रोलचा वापर कमी करून आयात बिल कमी करायचे आहे. याचे कारण बदलत्या परिस्थितीनुसार इतर देशांप्रमाणे भारताच्या ऊर्जा गरजाही बदलत आहेत. भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या उर्जेच्या गरजा अधिक वेगाने वाढत आहेत, परंतु तेल आणि वायूच्या बाबतीत, आयातीवर अवलंबित्व खूप जास्त आहे. अशा स्थितीत सरकार लोकांना त्यांच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.

उर्जेच्या पर्यायी स्त्रोतांचा अवलंब केल्याने देशाला परकीय चलनाच्या साठ्यात बचत तर होईलच, शिवाय पर्यावरण संरक्षणातही मदत होईल. हे लक्षात घेऊन सरकारने 2030 पर्यंत 40 टक्के वीज अपारंपरिक पद्धतीने निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सरकारने या वर्षाच्या अखेरीस सौर ऊर्जेपासून 100 GW वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे, त्यापैकी 40 मेगावॅट वीज छतावर सौर पॅनेल बसवून निर्माण करण्याचे नियोजन आहे. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार घराच्या छतावर सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदानही देत ​​आहे.

Solar Rooftop Scheme
8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 8 वा वेतन आयोग होणार लागू!

ही योजना (सोलर रुफटॉप सबसिडी स्कीम) सर्वसामान्यांसाठी अनेक बाबतीत फायदेशीर आहे. सर्वप्रथम, या योजनेंतर्गत सौर पॅनेल बसवण्याचा खर्च कमी आहे, कारण त्यातील काही भाग सरकारकडून अनुदान म्हणून उपलब्ध आहे. केंद्र सरकारशिवाय अनेक राज्य सरकारेही त्यांच्या वतीने अतिरिक्त अनुदान देत आहेत. दुसरीकडे सोलर पॅनल बसवल्याने वीज बिलाचा त्रास संपतो. तुमच्या घरातील दैनंदिन वापरासाठी वीज तुमच्या छतावरील सोलर पॅनेलमधून तयार केली जाते.

त्याचा तिसरा फायदा म्हणजे या योजनेत कमाईच्या संधी आहेत. घराच्या छतावरील सोलार पॅनल तुमच्या गरजेपेक्षा जास्त वीज बनवत असतील तर वीज वितरण कंपन्या तुमच्याकडून ती विकत घेतील. अशाप्रकारे, सोलर रूफटॉप सबसिडी योजना एकाच वेळी तीन जबरदस्त फायदे देते. ही अशी गुंतवणूक आहे, जी तत्काळ बचत तर देतेच, पण उत्पन्नाचीही व्यवस्था करते.

साधारणपणे 2-4kW चा सोलर पॅनल घरासाठी पुरेसा असतो. यामध्ये एक एसी, 2-4 पंखे, एक फ्रीज, 6-8 एलईडी लाईट, 1 पाण्याची मोटर आणि टीव्ही यांसारख्या गोष्टी आरामात वापरता येतात. आता समजा तुम्ही उत्तर प्रदेश (सोलर रूफटॉप स्कीम UP) मध्ये राहत आहात आणि तुमचे छप्पर 1000 चौरस फूट आहे. जर तुम्ही अर्ध्या छतावर म्हणजे 500 स्क्वेअर फूट मध्ये सौर पॅनेल बसवले तर प्लांटची क्षमता 4.6kW होईल. यामध्ये एकूण 1.88 लाख रुपये खर्च येणार असून, तो अनुदानानंतर 1.26 लाख रुपयांवर येईल.

तुमच्या घराच्या सर्व गरजा सौर पॅनेलने पूर्ण केल्याने तुम्ही दरमहा सुमारे ४,२३२ रुपयांचे वीज बिल वाचवाल. एका वर्षासाठी, बचत 50,784 रुपये होते. म्हणजेच तुमचा संपूर्ण खर्च अडीच वर्षांत वसूल होईल. 25 वर्षात तुमची एकूण बचत सुमारे 12.70 लाख रुपये असेल.

Solar Rooftop Scheme
WhatsApp Features: व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार जिओमार्टची खास सेवा

जर तुमचा वापर कमी असेल तर तुम्ही लहान प्लांट देखील लावू शकता. जर तुम्ही 2kW चा सोलर पॅनल बसवला तर त्यासाठी सुमारे 1.20 लाख रुपये खर्च येईल. 3 kW पर्यंत सौर रूफटॉप पॅनेल बसवण्यासाठी सरकारकडून 40 टक्के पर्यंत अनुदान उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत तुमचा खर्च 72,000 रुपयांपर्यंत खाली येईल आणि तुम्हाला सरकारकडून 48,000 रुपयांची सबसिडी मिळेल. सौर रूफटॉप स्थापित करण्यासाठी, तुम्ही त्याच्या अधिकृत वेबसाइट https://solarrooftop.gov.in/ ला भेट देऊन अर्ज करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com