मोदी सरकारच्या निर्णयाने अदानी विल्मार अन् रुची सोयाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे अदानी विल्मार आणि रुची सोयाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.
Ruchi Soya
Ruchi SoyaDainik Gomantak
Published on
Updated on

मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे अदानी विल्मार आणि रुची सोयाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. अदानी विल्मार आणि रुची सोयाच्या समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. बुधवारी, गौतम अदानी यांच्या खाद्य तेल कंपनी अदानी विल्मारचे शेअर्स बीएसईवर लोअर सर्किटवर अडकले. त्याचवेळी रुची सोयाच्या समभागांनाही लोअर सर्किटवरच ग्रहण लागले. (Shares of Adani Wilmar and Ruchi Soya have plummeted due to a decision by the Modi government)

Ruchi Soya
शेतकऱ्यांनो, सरकारी मदत घेऊन बांबू लागवड सुरू करा अन् श्रीमंत व्हा

वास्तविक, या समभागांच्या घसरणीमागे सरकारचा (Government) मोठा निर्णय आहे. सरकारने मंगळवारी क्रूड सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलाच्या आयातीवरील कस्टम ड्यूटी, एग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर अ‍ॅण्ड डेवलपेमेंट सेस झिरो करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच 20 लाख टनांपर्यंतच्या या कच्च्या तेलाच्या आयातीवर हा कर भरावा लागणार नाही. अशा परिस्थितीत आगामी काळात खाद्य तेल स्वस्त होणार आहे. त्यामुळेच खाद्यतेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण होताना दिसत आहे.

अदानी विल्मार आणि RUCHI SOYA चे शेअर्स

अदानी विल्मरचे शेअर्स आज BSE वर 5 टक्क्यांनी कमी होऊन 664.95 रुपयांवर व्यवहार करत आहेत. दुसरीकडे रुची सोयाच्या शेअर्समध्येही लोअर सर्किट आहे. हे शेअर्स BSE वर 5 टक्क्यांनी खाली 1045.45 रुपयांवर व्यवहार करत आहेत.

सरकारला काय म्हणायचे आहे?

आयात शुल्कातील ही सूट देशांतर्गत वाढत्या किमतींना नियंत्रणात ठेवेल. त्याचबरोबर महागाई (Inflation) नियंत्रणात ठेवण्यासही मदत करेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) ट्विटमध्ये लिहिले आहे की, "या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल." यासोबतच स्टील आणि प्लास्टिक उद्योगात वापरल्या जाणाऱ्या काही कच्च्या मालावरील आयात शुल्क हटवण्याचा निर्णयही घेण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com