शेअर बाजारात अस्थिरता; ऑटो शेअर्स वधारले

शेअर बाजार गेल्या दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये घसरणीसह बंद होत आहे.
Share market
Share market Dainik Gomantak
Published on
Updated on

शेअर बाजार गेल्या दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये घसरणीसह बंद होत आहे. या दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे सुमारे 7.7 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. विक्रेत्यांचे मार्केटवर वर्चस्व आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही बाजार घसरणीसह उघडला. आज सकाळी शेवटी सेन्सेक्स 364.91 अंकांनी म्हणजेच 0.67 टक्क्यांनी घसरून 54,470.67 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 109.40 अंकांनी म्हणजेच 0.67 टक्क्यांनी घसरून 16,301.85 वर बंद झाला. (Share Market Updates)

आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्सने 364 अंकांची घसरण नोंदवली होती. त्यापूर्वी शुक्रवारी बाजारात 867 अंकांची मोठी घसरण नोंदवण्यात आली. या दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे 7.73 लाख कोटी रुपयांचे भांडवल बुडाले होते.यामध्ये 24 शेअर्स ग्रीन सिग्नलमध्ये तेजीसह व्यवहार करत आहेत. एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती आणि स्टेट बँकचे शेअर सर्वाधिक वाढले आहे तर इन्फोसिस, विप्रो आणि टायटनच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे.

Share market
महागाईचा आणखी एक झटका! आटा, ब्रेड, बिस्किटांसह हे पदार्थ महागणार

कोटक सिक्युरिटीजचे इक्विटी रिसर्चचे प्रमुख श्रीकांत चौहान म्हणाले की, बाजारात अजूनही अल्प मुदतीसाठी मंदीचा कल दिसून येत आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे, त्यामुळे खरेदीदारांचे वर्चस्व राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरेदीदार कोणत्याही वेळी या स्तरावर वर्चस्व गाजवू शकतात. तांत्रिक आधारावर, निफ्टी 16200 च्या वर आणि सेन्सेक्स 54150 च्या वर राहिल्यास, खरेदीदारांचे वर्चस्व असल्यास निफ्टी 16450-16550 च्या पातळीवर परत येऊ शकतो. त्याचप्रमाणे सेन्सेक्स 55000-55300 च्या पातळीवर परत येऊ शकतो. मात्र, बाजारातील वातावरण मंदीचे आहे. जर बाजार आणखी घसरला तर निफ्टीसाठी 16100 आणि सेन्सेक्ससाठी 53900 हा महत्त्वाचा आधार आहे.

Share market
कठीण काळात बांगलादेशचा श्रीलंकेला मदतीचा हात; चलन स्वॅप सुविधेत एका वर्षाची वाढ

रुपयात थोडी सुधारणा

आज बाजारात किंचित वाढ होत असताना रुपयामध्ये सुधारणा दिसून येत आहे. आज सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया 18 पैशांच्या बळावर 77.29 वर उघडला. सोमवारी तो 77.47 च्या विक्रमी नीचांकी पातळीवर बंद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com