सुरुवातीच्या व्यापारात सेन्सेक्सने घेतली 311 अंकांवर उसळी

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही बाजार (Share Market Updates) तेजीत उघडला.
Share Market
Share MarketDainik Gomantak
Published on
Updated on

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही बाजार (Share Market Updates) तेजीत उघडला. आज सेन्सेक्स 311 अंकांच्या उसळीसह 53282 च्या पातळीवर तर निफ्टी 70 अंकांच्या उसळीसह 15912 च्या पातळीवर उघडला. निफ्टी बँक 198 अंकांनी वर आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 300 हून अधिक अंकांची उसळी घेत आहे. यावेळी टाटा स्टील, रिलायन्स आणि इंडसइंड बँकेचे शेअर्स वधारत आहेत. आज लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनची मेगा सूची (LIC Share Listing ) जाहिर होणार आहे. कालही शेअर बाजार 180 अंकांच्या उसळीसह बंद झाला. (Share Market Updates)

Share Market
LIC च्या शेअर्समध्ये घसरण झाल्यास गुंतवणूकदारांनी काय करावे? जाणून घ्या तज्ञांचे मत

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचा स्टॉक 8 टक्क्यांहून अधिक घसरणीसह सूचीबद्ध आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच NSE वर, LIC चा शेअर इश्यू किमतीच्या तुलनेत 8.11 टक्क्यांनी खाली 872 रुपयांवर सूचीबद्ध झाला. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच बीएसई वर 8.62 टक्क्यांनी घसरून 867.20 रुपयांवर लिस्ट झाला. 10 वाजल्यापासून शेअर्समध्ये ट्रेडिंग करता येईल. GEPL कॅपिटलचे विश्लेषक हर्षद गाडेकर यांनी सांगितले की, स्टॉक कमी झाल्यावर गुंतवणूकदारांनी नवीन खरेदी करावी.

Share Market
शेअर बाजारात LICची फ्लॉप सुरवात, एलआयसी स्टॉक पहिल्या दिवशी 12.60 टक्क्यांनी तोट्यात

आयटी आणि एफएमसीजी वगळता सर्वच क्षेत्रांत आज खरेदी दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 180.22 अंकांच्या म्हणजेच 0.34 टक्क्यांच्या वाढीसह 52,973.84 वर बंद झाला. तर दुसरीकडे, निफ्टी 60.15 अंकांच्या अर्थात 0.38 टक्क्यांच्या वाढीसह 15,842.30 वर बंद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com