आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची (Share Market) सुरूवात तेजीत दिसून येत आहे. आज मार्केट सुरू होताच सेन्सेक्सने (Sensex) 61 हजारांचा टप्पा ओलांडला असून निफ्टीही (Nifty) 18200 च्या जवळ पोहोचला आहे. ONGC चे शेअर्स सध्या 4 टक्क्यांनी वधारले आहेत. याशिवाय कोटक बँक (Kotak Bank) आणि एचडीएफसी बँकेचे (HDFC Bank) शेअर्सही वाढताना दिसत आहेत. बाजारात परकीय निधीचा ओघ (FDI) आणि जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक कल यामुळे एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि कोटक बँक यांसारख्या प्रमुख शेअर्समध्ये वाढ झाल्याने सोमवारी सुरुवातीच्या व्यापारात सेन्सेक्समध्ये 300 अंकांची वाढ दिसून आली
सेन्सेक्समध्ये सर्वाधिक एक टक्का वाढ टायटनमध्ये झाली. याशिवाय, आयटीसी, इंडसइंड बँक, कोटक बँक, एमअँडएम, एशियन पेंट्स आणि एचडीएफसी बँक देखील वाढीसह व्यवहार करत आहेत.
तर दुसरीकडेभारती एअरटेल, टेक महिंद्रा, एचडीएफसी आणि टाटा स्टीलचे शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्स काल 767 अंकांनी वाढून 60,686.69 वर बंद झाला होता. त्याचप्रमाणे निफ्टी 229.15 अंकांनी वाढून 18,102.75 वर पोहोचला.विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी एकूण 511.10 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते.
दरम्यान आज तीन कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होणार आहेत. PB Fintech (Policybazaar), SJS Enterprises आणि Sigachi Industries या कंपन्यांचे शेअर आज बाजारात लिस्टझाले आहेत .या तीन कंपन्यांचे आयपीओ 1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुले होते. पॉलिसीबझार आणि पैसाबाजारची मूळ कंपनी पीबी फिनटेक या तीनपैकी सर्वात मोठा आयपीओ होता. कंपनीने पहिल्या मार्गाने 5,625 कोटी रुपये उभे केले. हा शेअर ग्रे मार्केटमध्ये रु. 150-160 च्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहे, जो इश्यू किमतीपेक्षा 15-20 टक्क्यांनी जास्त आहे. कंपनीने 940-980 रुपयांच्या प्राइस बँडमध्ये शेअर्स विकले आहेत.
कंपनीचा शेअर बीएसईवर 17.335 टक्क्यांच्या प्रीमियमसह 1,150 रुपयांवर सूचीबद्ध झाला. 980 रुपयांच्या इश्यू किमतीच्या वरच्या बँडनुसार, शेअर 170 रुपयांच्या वाढीसह सूचीबद्ध झाला. लिस्टिंगनंतर, पॉलिसीबाझारचा स्टॉक वाढला आणि त्याने 1205 रुपयांचा उच्चांक गाठला. या किमतीत कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 53,000 कोटी रुपये झाले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.