Share Market चा आलेख वाढताच, कंपन्यांचे मार्केट कॅप 1 लाखांच्या पार

Sensex च्या पहिल्या 10 कंपन्यांपैकी आठ कंपन्यांचे मार्केट कॅप गेल्या आठवड्यात एकत्रितपणे 1,52,355.03 कोटी रुपयांनी वाढले आहे . (Share Market)
Share Market on high Sen sexnsex companies Market cap reached on 1 lakh
Share Market on high Sen sexnsex companies Market cap reached on 1 lakh Dainik Gomantak
Published on
Updated on

Sensex च्या पहिल्या 10 कंपन्यांपैकी आठ कंपन्यांचे मार्केट कॅप (Market Cap) गेल्या आठवड्यात एकत्रितपणे 1,52,355.03 कोटी रुपयांनी वाढले आहे . मागच्या आठवड्यात मार्केटमध्ये एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि स्टेट बँक ऑफ इंडियाला (SBI) सर्वाधिक फायदा झाला आहे . गेल्या आठवड्यात BSE च्या 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1,246.89 अंकांनी वाढला होता. तर गुरुवारी सेन्सेक्सने प्रथमच 61,000 चा आकडा पार केला होता आणि दसऱ्यानिमित्त शुक्रवारी बाजारपेठा बंद होत्या.(Share Market on high Sen sexnsex companies Market cap reached on 1 lakh)

संपूर्ण बाजाराचा विचार करता मागच्या आठवड्यात एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल 46,348.47 कोटी रुपयांनी वाढून 9,33,559.01 कोटी रुपये झाले आहे तर एसबीआयचे बाजार मूल्यांकन 29,272.73 कोटी रुपयांनी वाढून 4,37,752.20 कोटी रुपये झाले आहे . त्याचप्रमाणे रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मूल्यांकन 18,384.38 कोटी रुपयांनी वाढून 17,11,554.55 कोटीवर पोहचले आहे.

ICICI बँकेचे मार्केट कॅप 5 लाख कोटींच्या पार

ICICI बँकेची सध्याची बाजारातील स्थिती 16,860.76 कोटी रुपयांनी वाढून 5,04,249.13 कोटी रुपये तर HDFC ची 16,020.7 कोटी रुपयांच्या वाढीसह 5,07,861.84 कोटी रुपये झाली आहे. तर दुसरीकडे कोटक महिंद्रा बँकेचे बाजार भांडवल 15,944.02 कोटी रुपयांनी वाढून 3,99,810.31 कोटी रुपये आणि बजाज फायनान्सचे 7,526.82 कोटी रुपयांनी वाढून 4,74,467.41 कोटी रुपये झाले आहे . हिंदुस्थान युनिलिव्हरने मागच्या आठवड्यात 1,997.15 कोटी रुपये जोडले आणि त्याचे बाजार मूल्य 6,22,359.73 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

TCS कंपनीचा मार्केट कॅप 1.20 लाख कोटी रुपयांनी घसरला

याउलट टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे बाजार भांडवल 1,19,849.27 कोटी रुपयांनी घटून 13,35,838.42 कोटी रुपयावर झाले आहे . तर सोमवारी इन्फोसिसची बाजार स्थिती 3,414.71 कोटी रुपयांनी घसरून 7,27,692.41 कोटी रुपयांवर गेली कारण टीसीएसचा तिमाही निकाल अपेक्षेप्रमाणे न आल्याने त्याचा शेअर सहा टक्क्यांहून अधिक घसरला होता.

Reliance अव्वलस्थानीच

या आठवड्यात देखील रिलायन्स इंडस्ट्रीजने पहिल्या 10 कंपन्यांच्या यादीत पहिले स्थान कायम ठेवले आहे. त्यानंतर अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँक आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com