आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आणि मागच्या आठवड्याचा विचार करता सलग सातव्या दिवशी बाजार (Share Market) तेजीसह उघडला आहे. आज सकाळी Sensex 509 अंकांच्या वाढीसह 61819 वर सुरू झाला आणि ट्रेडिंग दरम्यान आतापर्यंत 61893 च्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे . सकाळी 10 वाजता सेन्सेक्स 379 अंकांच्या वाढीसह 61685 च्या पातळीवर व्यवहार करत होता तर Nifty 156 गुणांच्या वाढीसह 18494 च्या पातळीवर पोहोचला होता.(Share Market on green Sensex reached on 61 thousand)
सध्या सेन्सेक्सच्या टॉप -30 मधील 23 शेअर्स वाढीसह तर 7 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. टायटन, इन्फोसिस, टाटा स्टील आणि मारुती या कंपनीचे शेअर्स तेजीत दिसत आहेत. ता दुसरीकडे एशियन पेंट्स, एचसीएल आणि डॉ.रेड्डी या कंपनीचे शेअर्स नुकसानीत व्यवहार करत आहेत.
मागील आठवड्यात मार्केट बंद होताना गुरुवारी सेन्सेक्स 568.90 अंकांनी वाढून 61,305.95 वर बंद झाला होता. तर निफ्टीही 176.80 अंकांनी वाढून 18,338.55 अंकांच्या उच्चांकावर पोहोचला होता.
बीएसई सेन्सेक्सवरील टायटनच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या व्यापारात सर्वाधिक 2.88 टक्के वाढ दिसून आली आहे याशिवाय इन्फोसिस, टाटा स्टील, मारुती, आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रिड, भारती एअरटेल, कोटक महिंद्रा बँक, एसबीआय आणि एचयूएलचे शेअर्स सर्वाधिक वाढले आहेत . याशिवाय एनटीपीसी, आयटीसी, नेस्ले इंडिया, बजाज फिनसर्व, टीसीएस, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा, सन फार्मा, एल अँड टी, अॅक्सिस बँक, एम अँड एम, बजाज फायनान्स आणि रिलायन्सचे शेअर्स देखील वाढताना पाहायला मिळत आहेत.
तर दुसरीकडे, एशियन पेंट या कंपनीचे शेअर्स सर्वात जास्त 1.42 टक्क्यांनी घसरले आहेत . याशिवाय, एचसीएल टेक, डॉ. रेड्डीज, बजाज ऑटो, इंडसइंड बँक, एचडीएफसी, एचडीएफसी बँकेचे शेअर्समध्ये नुकसान होताना दिसत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.