Share Market: शेअर बाजाराने मोडले सर्व विक्रम; गुंतवणुकदारांच्या झोळीत 1.72 लाख कोटी

Bombay Stock Exchange: मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स 634 अंकांनी वधारला आणि विक्रमी 64,050.44 अंकांवर पोहोचला.
Share Market
Share MarketDainik Gomantak
Published on
Updated on

Nifty 50 hits all time high: शेअर बाजाराने अवघ्या एका महिन्यात ६३ हजार ते ६४ हजारांचा टप्पा ओलांडून मोठा विक्रम केला आहे. ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्समध्ये 500 हून अधिक अंकांची वाढ दिसून आली.

दुसरीकडे निफ्टीनेही 19000 अंकांची पातळी तोडली. शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांना 1.72 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.

शेअर बाजारातील वाढीचे सर्वात मोठे कारण म्हणजे टाटा समूहाच्या कंपन्या आणि अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली वाढ. दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये दीड टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे

नवा विक्रम

बुधवारी शेअर बाजाराने नवा विक्रम केला. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 634 अंकांनी वधारला आणि विक्रमी 64,050.44 अंकांवर पोहोचला.

दुपारी 2:32 वाजता, सेन्सेक्स सुमारे 600 अंकांच्या वाढीसह 64,009.37 अंकांवर व्यवहार करत होता. विशेष बाब म्हणजे 29 मे रोजी सेन्सेक्स पहिल्यांदा 63 हजारांचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरला होता.

एका महिन्यानंतर सेन्सेक्सने 64 हजारांचा टप्पा ओलांडून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

Nifty 50 ने ओलांडली 19 हजारांची पातळी

दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक निफ्टीनेही 19 हजारांची पातळी ओलांडून विक्रमी अंक गाठले आहेत. आकडेवारीनुसार, निफ्टी सध्या 154 अंकांच्या वाढीसह 18,972 अंकांवर व्यवहार करत आहे.

ट्रेडिंग सत्रादरम्यान निफ्टी 19,011.25 अंकांवर पोहोचला. निफ्टीने प्रथमच 19 हजार अंकांची पातळी ओलांडली आहे. तज्ञांच्या मते या वर्षी निफ्टी 19500 चा स्तर गाठू शकतो.

Share Market
Air India Vistara Merger: एअर इंडियाला झटका! टाटा समूहाची मोठी योजना अडचणीत, आधी द्यावं लागेल 'हे' उत्तर

टाटा, अदानी ग्रुपच्या जोरावर बाजार तेजीत

आज शेअर बाजारात, टाटा ग्रुप आणि अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजीमुळे सकारात्मक वातावरण होते.

टाटा समूहाबद्दल बोलायचे झाल्यास, टाटा मोटर्सचे शेअर्स सुमारे अडीच टक्क्यांच्या वाढीसह सेन्सेक्सवर 586.45 रुपयांवर व्यवहार करत आहेत. त्याच वेळी, टायटनच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

रिलायन्सच्या शेअर्समध्येही दीड टक्क्यांनी वाढ होताना दिसत आहे.

अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये 4 टक्क्यांनी वाढ होत आहे. त्याचवेळी अदानी पोर्टचे शेअर्सही साडेतीन टक्क्यांच्या वेगाने व्यवहार करत आहेत.

Share Market
Central Government Scheme For Farmers: शेतकऱ्यांसाठी खूशखबर! आजपासून आणखी एक नवीन योजना सुरु, करोडो लोकांना होणार फायदा!

गुंतवणुकदारांची चांदी

दुसरीकडे गुंतवणुकदारांची चांदी होताना दिसत आहे. बीएसईचे मार्केट कॅप गुंतवणूकदारांच्या कमाईशी जोडलेले असते.

एका दिवसापूर्वी बीएसईचे मार्केट कॅप 2,92,13,242.62 कोटी रुपये होते. बुधवारच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान, BSE चे मार्केट कॅप 29385465.26 कोटींहून अधिक पोहोचले.

याचा अर्थ शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना 1.72 लाख कोटी रुपयांहून अधिक फायदा झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com