मंगळवारी सेन्सेक्स (Sensex) 58,630 अंकांवर सुरू झाला आहे. काल मार्केट ज्यावेळी बंद झाले त्यापेक्षा आजच्या मार्केटमध्ये (Share Market) 150 अंकांनी वाढ पाहायला मिळाली. आज HCL Tech, Hindunilvr सह बहुतेक कंपन्यांचे शेअर्सच्या किंमती वाढल्या आहेत. दुसरीकडे, निफ्टी (Nifty) 17,396.90 च्या कालच्या बंदच्या विरोधात 17,450.50 अंकांवर उघडला. दोन दिवसांच्या घसरणीनंतर दोन्ही निर्देशांक चांगल्या अंकावर खुले झाले आहेत.(Share Market: Investor's Loss of Rs 5 lakh crore in 2 days)
जागतिक स्तरावर मार्केट कामकुवत होत असतानाच शेअर बाजारात दोन दिवसांच्या घसरणीमुळे सोमवारी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 5,31,261.2 कोटी रुपयांची घट झाली आहे. सलग दुस-या ट्रेडिंग सत्रात बाजार घसरला आणि 30-शेअर सेन्सेक्स सोमवारी 524.96 अंकांनी खाली येऊन 58,490.93 अंकांवर बंद झाला होता. ट्रेडिंग दरम्यान, ते 626.2 अंकांवर घसरले होते. एचडीएफसी बँक, एचडीएफसी, टाटा स्टील आणि आयसीआयसीआय बँकेतील मोठ्या तोट्यामुळे बाजार अधिकच घसरला.
यापूर्वी शुक्रवारी सेन्सेक्स मागील व्यापार सत्रात 125.27 अंकांनी घसरून 59,015.89 वर बंद झाला होता . दोन दिवसांच्या घसरणीसह बीएसईच्या कंपन्यांचे बाजार भांडवल 5,31,261.2 कोटी रुपयांनी घटून 2,55,47,093.92 कोटी रुपये झाले होते.
सलग दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर बाजारात घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांची संपत्ती 5,31,261.2 कोटींनी कमी झाली. सेन्सेक्सच्या शेअर्समध्ये टाटा स्टीलचा सर्वात मोठा तोटा झाला, टाटाचा शेअर 9.53 टक्क्यांनी खाली आला. त्यानंतर स्टेट बँक, इंडसइंड बँक आणि एचडीएफसीने या बँकांत देखील तोटा पाहायला मिळाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.