5G Network : फोनमध्ये 5G नेटवर्क मिळत नाही? मग ताबडतोब करा हे बदल

जर तुमच्या स्मार्टफोनला 5G सेवा मिळत नसेल तर तुम्हाला फोनच्या सेटिंगमध्ये काही बदल करावे लागतील.
5G Network Setting in Phone
5G Network Setting in Phone Dainik Gomantak
Published on
Updated on

रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलने भारतातील निवडक शहरांमध्ये 5G नेटवर्क उपलब्ध करून दिले आहे. परंतु अनेक वापरकर्ते तक्रार करत आहेत की त्यांच्या स्मार्टफोनला 5G नेटवर्क मिळत नाही. तरीही त्यांच्या शहरात 5G नेटवर्क उपलब्ध झाले आहे. जर तुमच्या स्मार्टफोनला 5G सेवा मिळत नसेल तर तुम्हाला फोनच्या सेटिंगमध्ये काही बदल करावे लागतील.

5G Network Setting in Phone
HDFC FD Scheme : HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर! या विशेष FD योजनेची अंतिम मुदत वाढवली

फोनमध्ये 5G सपोर्ट कसा मिळवायचा? करा हे बदल

  • सर्वप्रथम, तुम्हाला फोनच्या सेटिंग्ज अॅपवर क्लिक करावे लागेल.

  • यानंतर तुम्हाला वाय-फाय आणि नेटवर्क या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

  • त्यानंतर वापरकर्त्यांना सिम आणि नेटवर्क पर्यायावर क्लिक करावे लागेल.

  • यानंतर तुम्हाला सर्व तंत्रज्ञानाची यादी दिसेल.

  • यामध्ये तुम्हाला तळाशी Preferred Network Type हा पर्याय दिसेल.

  • तुमच्या फोनमध्ये 5G सपोर्ट असेल, तर तो 2G, 3G, 4G आणि 5G सपोर्ट दाखवेल.

  • यातून तुम्हाला 5G नेटवर्क पर्याय निवडावा लागेल.

Jio आणि Airtel ने 5G सेवा सुरू केली

रिलायन्स जिओने 4 शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. ही शहरे कोलकाता, दिल्ली, मुंबई आणि वाराणसी आहेत. दुसरीकडे, एअरटेलने 8 शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. यामध्ये दिल्ली, वाराणसी, नागपूर, बंगळुरू, हैदराबाद, मुंबई, चेन्नई आणि सिलीगुडी या शहरांचा समावेश आहे.

Airtel CEO नी सांगितले आहे की, 2024 पर्यंत, 5G सेवा संपूर्ण देशात आणली जाईल. दुसरीकडे Jio 5G डिसेंबर 2023 पर्यंत प्रत्येकासाठी उपलब्ध होईल. जिओने 2023 पर्यंत देशभरात 5G सेवा देण्याचा दावाही केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com