आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारामध्ये स्थिर सुरुवात झाली. आज सेन्सेक्स वधारत सुरू झाला तर निफ्टी 26 अंकानी वधारत 16241 अंकावर सुरू झाला. (Share Market Opening News)
आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये थोडी तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये 109 अंकानी वधारून 54397 अंकावर व्यवहार करत आहे. तर, निफ्टी 35 अंकाने वधारत 16248 वर व्यवहार करत आहे. शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांक खरेदीचे संकेत देत होते. पण थोड्यावेळात पुन्हा घसरण सुरू झाली.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 20 शेअर्स वधारले आहेत. तर, 10 शेअरमध्ये घसरण झाली आहे. निफ्टी 50 मधील 32 शेअरमध्ये तेजी दिसत आहे. तर, 18 शेअरमध्ये घसरण सुरू आहे. शेअर बाजारात बँकिंग, ऑटो, मेटल्स, एनर्जी क्षेत्रातील शेअर पडताना दिसत आहेत.
हिंदुस्थान युनिलिव्हर 2.55 टक्के, भारती एअरटेलमध्ये 0.53 टक्के, आयटीसीमध्ये 0.447 टक्के, टीसीएसमध्ये 0.39 टक्के, इन्फोसिच्या शेअरमध्ये 0.34 टक्क्यांची घसरण झाली आहे.
मेटल कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. झोमॅटो कंपनीचे तिमाही निकाल चांगले आल्याने त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. मागील काही दिवस झोमॅटोचे पडेल होते पण आज शेअर दरात तेजी दिसून आली आहे. तसेच , टाटा स्टील, टाटा मोटर्स, ओएनजीसी, अदानी पोर्ट, सन फार्मासारख्या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी पाहायला मिळलाई आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.