Pension News: वृद्धांसाठी खूशखबर, दरमहा 3 हजार रुपयांनी वाढणार पेन्शन!
Pension For Senior Citizens: वृद्धांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशाचा अर्थसंकल्प मांडण्यास अवघे काही दिवस उरले असून यावेळी सरकार वृद्धांसाठी मोठी घोषणा करु शकते. केंद्र सरकार गरीब, महिला, शेतकरी आणि वृद्धांसह सर्व घटकांना काही प्रमाणात दिलासा देण्याची तयारी करत आहे. यावेळी वृद्ध लोकांच्या पेन्शन योजनेत वाढ होण्याची शक्यता आहे. यासोबतच या लोकांना इन्कम टॅक्समध्ये सूट मिळू शकते.
यामध्ये मिळणार सूट
सामान्य अर्थसंकल्पापूर्वी (Budget), काही गैर-सरकारी संस्थांनी (एनजीओ) देशातील वृद्ध लोकांच्या सुधारणेसाठी पावले उचलण्याची सूचना केली आहे. यामध्ये वृद्धापकाळाच्या पेन्शनमध्ये वाढ, अतिरिक्त आयकर सवलत आणि वृद्ध लोक वापरत असणाऱ्या उत्पादनांवर जीएसटी सूट यांचा समावेश आहे.
एजवेल फाउंडेशनने मागणी केली
एनजीओ एजवेल फाऊंडेशनने म्हटले की, वृद्ध आणि तरुण पिढीमधील वाढती दरी, वृद्ध लोकांच्या जीवनशैलीत होणारे बदल लक्षात घेऊन त्यांच्यासाठी बजेटमध्ये तरतूद करावी.
पेन्शनमध्ये दरमहा 3000 रुपयांनी वाढ करावी
मंथली वृद्धापकाळ निवृत्ती वेतनातील केंद्र सरकारचा (Central Government) सध्याचा वाटा प्रत्येक पात्र वृद्ध व्यक्तीसाठी दरमहा 3,000 रुपये करण्यात यावा, असे निवेदनात म्हटले आहे. त्यानुसार राज्य सरकारलाही त्यांच्या वाट्यामध्ये सुधारणा करण्याचा सल्ला देण्यात यावा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.