LIC च्या जीवन लाभ पॉलिसीसह तुमचे भविष्य करा सुरक्षित

ही पॉलिसी मर्यादित प्रीमियम भरणारी योजना आहे जी संरक्षण आणि बचत देते.
Secure your future with LIC Jeevan Labh Policy

Secure your future with LIC Jeevan Labh Policy

Dainik Gomantak

Published on
Updated on

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या जीवन लाभ पॉलिसीसह तुमचे भविष्य सुरक्षित करा. या पॉलिसी अंतर्गत, जर तुम्ही काही वर्षांमध्ये दररोज फक्त 251.7 रुपये जमा केले तर तुम्हाला 20 लाख रुपयांचा परतावा मिळेल. ही पॉलिसी (LIC Policy) मर्यादित प्रीमियम भरणारी योजना आहे जी संरक्षण आणि बचत देते. ही नॉन लिंक्ड स्कीम आहे.

एलआयसीच्या (LIC) या योजनेचे अनेक फायदे आहेत. यामध्ये तुम्हाला कमी गुंतवणुकीत चांगला परतावा मिळू शकतो. परिपक्वतापूर्वी एखाद्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास या पॉलिसी अंतर्गत कुटुंबाला आर्थिक मदत देखील दिली जाते. पॉलिसी खरेदी केल्याने, तुम्हाला बचत आणि संरक्षण दोन्ही मिळेल. केवळ 8 ते 59 वर्षे वयोगटातील लोक ही योजना खरेदी करू शकतात. म्हणजेच ही पॉलिसी अल्पवयीन व्यक्तीसाठीही घेतली जाऊ शकते. ही पॉलिसी 16 ते 25 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी घेतली जाऊ शकते.

<div class="paragraphs"><p>Secure your future with LIC Jeevan Labh Policy</p></div>
Government Scheme: या वर्षी शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट

20 लाख रुपये कसे मिळवायचे?

जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 20 व्या वर्षी पॉलिसी खरेदी केली आणि 16 वर्षांसाठी दररोज 251.7 रुपये भरले तर त्याला 45 वर्षांच्या वयात 20 लाख रुपये मिळतील. IPO आणण्यापूर्वी LIC आपल्या व्यवसायाला धार देत आहे. शेअर बाजारातील चांगली कामगिरी पाहता कंपनी युनिट लिंक्ड प्लॅन म्हणजेच युलिपचा व्यवसाय वाढवण्याच्या तयारीत आहे. LIC कडे सध्या फक्त 3 ULIP योजना आणि फक्त 3 आरोग्य योजना आहेत. 11 एंडोमेंट आणि 9 मनी बॅक योजना आहेत.

एलआयसी जीवन लाभ पॉलिसीची वैशिष्ट्ये-

>> किमान विमा रक्कम रु.2 लाख आहे. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.

>> या पॉलिसीची पॉलिसी टर्म 16 ते 25 वर्षांच्या दरम्यान आहे.

>> या पॉलिसीसाठी प्रीमियम भरण्याची मुदत 10 ते 16 वर्षे आहे.

>> 8 वर्षांखालील लोक ही पॉलिसी घेऊ शकतात. या पॉलिसीमध्ये प्रवेशाचे कमाल वय 59 वर्षे आहे.

>> तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर नियमितपणे प्रीमियम भरू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com