SBI YONO: ग्राहकांसाठी बॅंकेने दिली महत्वाची माहीती

SBIने दिलेल्या माहितीनुसार YONO एसबीआय बँकिंग बरोबरच योनो एसबीआय आपली सुरक्षा वैशिष्ट्ये सुद्धा वाढवत आहे.
SBI Yono Updated
SBI Yono UpdatedDainik Gomantak
Published on
Updated on

एसबीआय योनो (SBI YONO) अलीकडेच एक नवीन नियम लागू केला आहे, ज्याची ग्राहकांना माहिती असणे आवश्यक आहे. खरं तर, गेल्या एका वर्षात नेटबँकिंग व्यवहारात मोठी वाढ झाली आहे, परंतु त्याबरोबरच फसवणूकीच्या अनेक समस्यादेखील येत आहेत. YONO अपडेटेड व्हर्जन नवीन सुरक्षा वैशिष्ट्यांसह येत असल्याचे बँकेने म्हटले आहे. ग्राहकांना आता नोंदणीकृत मोबाइल फोन नंबरचा वापर करुनच YONO अॅपवर लॉग इन करावे लागणार आहे. योनोच्या नव्या नोंदणीसाठी बँकेने ग्राहकांना बँकेत नोंदणीकृत मोबाइल नंबर वापरावा लागणार असल्याचा सांगितले आहे. (Important news for SBI Yono customers)

एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार 'YONO एसबीआय बँकिंग बरोबरच योनो एसबीआय आपली सुरक्षा वैशिष्ट्ये सुद्धा वाढवत आहे. अपग्रेड व्हर्जनमुळे तुम्ही YONO ला फक्त बँकेकडे नोंदणीकृत मोबाईल नंबरवरुनच लॉग इन करू शकणार आहात.

फ्रॉड कॉल करणारे चोर नेहमी युजरनेम, पासवर्ड आणि इतर वैयक्तिक माहिती, बॅंक खात्याचे तपशील ग्राहकांकडुन मिळवण्याचा प्रयत्न करतात, आणि दुसऱ्या मोबाईलवरुन ते YONO खाते सुरु करुन त्यातील रक्कम पळवण्याचा प्रयत्न करतात, मात्र आता YONOने केलेल्या सुधारणांनुसार ग्राहकांनी जर रजीस्टर्ड फोन नंबरवरुन YONO वापरल्यानंतर हा धोका टळणार आहे.

SBI Yono Updated
LPG Cylinder Booking: गॅस बुकिंगसाठी 'या' ॲप वापर करत मिळवा बंपर कॅशबॅक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com