कोरोना उपचारासाठी SBI देत आहे कर्ज, गरज भासल्यास असा करा अर्ज

एसबीआई कवच पर्सनल लोन कसे घ्यावे?
Money
MoneyDainik Gomantak
Published on
Updated on

देशात कोरोना विषाणू संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण देशाची चिंता वाढली आहे. पण, आज आम्ही तुम्हाला अशी माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुमची चिंता काही प्रमाणात कमी होईल. आजच्या परिस्थितीत आरोग्य विमा घेणे खूप महत्वाचे झाले आहे, परंतु जर तुमच्याकडे अद्याप आरोग्य विमा (Insurance) नसेल आणि काही कारणाने तुम्हाला कोरोना (Corona) विषाणूची लागण झाली असेल, तर उपचाराचा खर्च तुम्हाला त्रास देऊ शकतो. उपचारासाठी पुरेसे पैसे नसताना ही समस्या आणखीनच मोठी होते. पण, तुम्ही SBI चे ग्राहक असाल तर ही समस्या कमी होऊ शकते. (SBI latest news update)

एसबीआई कवच पर्सनल लोन

SBI कवच वैयक्तिक कर्ज देत आहे. कोविड पॉझिटिव्ह आढळलेल्या लोकांच्या उपचारात आर्थिक मदत करणे हा त्याचा उद्देश आहे. SBI वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, SBI Kavach Personal Loan चे लक्ष्य गट हे बँकेचे पगारदार, पगार नसलेले तसेच निवृत्ती वेतनधारक आहेत. या कर्जाचे पैसे ग्राहकाच्या पगार/पेन्शन/चालू/बचत खात्यात जमा केले जातात, जे ग्राहक त्याच्या उपचारावर खर्च करू शकतात.

Money
SBI ने दिली करोडो ग्राहकांना खुशखबर! अधिक कमावण्याची दिली संधी

फी, व्याज, कार्यकाळ आणि रक्कम

SBI वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, SBI Kavach Personal Loan Processing Fee, Security, Repayment Penalty आणि Foreclosure Fee शून्य (0) आहे. यासाठी ग्राहकाला कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. त्याचबरोबर व्याजदराबद्दल बोलायचे झाले तर त्यावर ८.५ टक्के व्याजदर लागू होतो. त्याचा कालावधी 60 महिन्यांपर्यंत असू शकतो (3 महिन्यांच्या स्थगितीसह). SBI या अंतर्गत किमान 25,000 रुपये ते कमाल 5 लाख रुपये कर्ज देते. ते पात्रतेनुसार आहे.

एसबीआई कवच पर्सनल लोन कसे घ्यावे?

तुम्ही पात्र असल्यास, तुम्ही SBI इंटरनेट बँकिंग, SBI Yono अॅप आणि तुमच्या जवळच्या SBI शाखेद्वारे SBI Kavach वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. मात्र, यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांबाबत बँकेच्या वेबसाइटवर फारशी माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, एसबीआय कवच वैयक्तिक कर्जासाठी कोविड पॉझिटिव्ह अहवाल (३० दिवसांपेक्षा जुना नाही) आवश्यक असल्याची नोंद आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com