SBIने दिला झटका: गृहकर्ज अन् कार लोन झाले महाग

देशातील सर्वात मोठी बँक SBI या MCLR वर 15 एप्रिलपासून गृहकर्ज, कार कर्ज आणि इतर कर्ज घेणे महाग झाले आहे.
SBI
SBIDainik Gomantak
Published on
Updated on

देशातील सर्वात मोठी बँक SBI या MCLR वर 15 एप्रिलपासून गृहकर्ज, कार कर्ज आणि इतर कर्ज घेणे महाग झाले आहे. याचे कारण असे की स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) वर घेतलेल्या सर्व मुदत कर्जावरील व्याजदरात 0.10 टक्के वाढ केली आहे. बँकेच्या वेबसाइटवर जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये एमसीएलआरमध्ये ही वाढ 15 एप्रिलपासून लागू होणार असल्याचे सांगितले आहे. (SBI home loans car loans and other loans have become more expensive)

SBI
IRCTC Executive Lounge : आता रेल्वे स्थानकावरही मिळणार विमानतळासारखी सुविधा

दर कितीने वाढले ते जाणून घ्या

बँकेने एक दिवस, एक महिना आणि तीन महिन्यांसाठी MCLR 6.65 टक्क्यांवरून 6.75 टक्केवर केला. तर त्याच वेळी, MCLR सहा महिन्यांसाठी 6.95 टक्क्यांवरून 7.05 टक्के करण्यात आला.

नवीन MCLR चालू वर्षासाठी

देशातील सर्वात मोठ्या कर्जदाराने एक वर्षाचा MCLR 7 टक्क्यांवरून 7.10 टक्केवर केला. दोन वर्षांचा MCLR 7.20 टक्क्यांवरून 7.30 टक्के आणि तीन वर्षांचा MCLR 7.30 टक्क्यांवरून 7.40 टक्के एवढा करण्यात आला आहे.

बँक ऑफ बडोदानेही वाढवले दर

दरम्यान, बँक ऑफ बडोदानेही सर्व मुदत कर्जावरील MCLR 0.05 टक्क्यांनी वाढवला. ही दरवाढ 12 एप्रिलपासून लागू झाली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे.

SBI
गुंतवणुकीत 15-15-15 चा नियम पाळून बना कोट्यधीश

एका वर्षाच्या कालावधीसाठी MCLR 7.35 टक्के करण्यात आल्याचे बँकेने म्हटले आहे. त्याच वेळी, एक दिवस, एक महिना, तीन महिने आणि सहा महिन्यांसाठी MCLR अनुक्रमे 6.50 टक्के, 6.95 टक्के, 7.10 टक्के आणि 7.20 टक्के करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com