आज डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये विक्रमी घसरण झाली आहे. ही घट 21 पैशांनी झाली आहे. आज प्रति डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 77.13 रुपये झाली असून असून शुक्रवारी हीच किंमत 76.92 रुपये प्रति डॉलर इतकी होती. रुपयाची आजवरची ही सर्वात मोठी घसरण असून रुपया आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर आल्याचे म्हटले जात आहे. (Rupee-Dollar Latest News)
सुरुवातीच्या व्यापारातच, भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 77.20 रुपये प्रति डॉलरवर आला होता, म्हणजेच 1 डॉलरसाठी आपल्याला 77.20 रुपये मोजावे लागतील. शुक्रवारी, तो 77.05 च्या आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर आला आहे.
रुपयाच्या घसरणीचे कारण काय?
सुरक्षित जागतिक बाजारपेठेत पैसे गुंतवण्याचा गुंतवणूकदारांचा निर्णय, रशिया-युक्रेन युद्ध युरोपात पोहोचण्याची भीती आणि वाढलेले व्याजदर याचा परिणाम शेअर बाजारावर झाला असून; हेच रुपयाच्या घसरणीमागचे कारण सांगण्यात येत आहे.
डॉलर निर्देशांक त्याच्या दोन दशकांच्या (20-वर्ष) उच्च पातळीवर पोहोचला आहे आणि सलग पाच आठवडे वरच्या पातळीवर राहिला आहे. फेडरल रिझर्व्हने अलीकडेच बेंचमार्क फंड रेट 0.50 टक्क्यांनी वाढवले आहेत, ज्यामुळे डॉलरचे जागतिक मूल्य वाढले आहे. त्याच वेळी, भारतीय बाजारातील सध्याच्या शंकांमुळे, रुपयासाठी गुंतवणूकदारांची भावना कमकुवत झाली आहे आणि आज तो आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.